शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ मे २०२२; मेष, मिथुन, मकर यांना अचानक धनलाभाची शक्यता; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 07:34 IST

Today's horoscope, May 23, 2022:  कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या...

मेष- धनलाभ होण्याची शक्यता आहे. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. आपले राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करा. त्याचा निश्चितच फायदा होईल. बरेच दिवसांपासून वाट पाहत असलेली सुसंधी मिळेल. मन प्रसन्न राहील.

वृषभ - जीवनसाथी चांगली साथ देईल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे आनंद मिळेल. आर्थिक आवक सामान्य राहील. आळस झटकून कामे करण्याची गरज आहे. सकारात्मक विचार राहतील असे पाहा. कुणी तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल.

मिथुन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. आर्थिक आवक चांगली राहील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रासमवेत वेळ मजेत जाईल. खचला आवर घातला पाहिजे.

कर्क- व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होतील, प्रवास कार्य साधक ठरतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक आवक चांगली राहील. उसने दिलेले पैसे परत मिळतील.

सिंह - नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात तुमचा फायदा होईल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल, नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. काहींना प्रवास करावा लागेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील.

कन्या- धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. कामाचा झपाटा विलक्षण राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. हातून दानधर्म घडेल. व्यवसायात बरकत राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील, प्रलंबित प्रश्न सुटतील.

तूळ - वादविवाद टाळणे योग्य ठरेल. इतरांच्या भानगडीत पडू नका. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. नोकरीत कामाचा ताण वाढेल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. आर्थिक आवक चांगली राहील.

वृश्चिक - व्यवसायात सतत व्यस्त राहाल. चांगल्या घटना घडतील. नशिबाची साथ मिळेल. मदत मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जवळच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

धनू- नोकरीत तुमच्या मताला किंमत राहील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल, प्रगतीचा आलेख उंचावत राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील, चांगली बातमी कानावर पडेल.

मकर- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. हाती चांगला पैसा येईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. कुणाचा अपमान होईल असे बोलू नका.

कुंभ- दगदग होईल अशी कामे करू नका. नोकरीत अनाहूत कामे अंगावर ओढवून घेऊ नका, एखादे काम कमी झाले तर चालेल पण ताण वाढवून घेतला तर चुका होतील आणि त्याचे खापर तुमच्यावर फुटेल. इतरांच्या भानगडीत पडू नका.

मीन- महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. लोकांची मदत मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्र, नातेवाईकाच्या भेटीगाठी होतील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. 

-विजय देशपांडे, ज्योतिष विशारद

टॅग्स :Astrologyफलज्योतिष