शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - २८ फेब्रुवारी २०२२; 'या' राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, जमिनीच्या व्यवहारातही फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 07:30 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – नोकरीत बदलाची चाहूल लागेल. जे काही बदल होतील ते तुमच्या फायद्याचे ठरतील. घरी पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील. लोकांच्या भेटीगाठीमुळे मन मोकळे होईल. जीवनसाथीची चांगी साथ राहील. क्रोधाला आवर घाला. मुलांना रागावू नका.

वृषभ – भाग्याची चांगली साथ राहील. अडचणी दूर होतील. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होईल. काहींना धार्मिक कार्यासाठी प्रवास करावा लागेल. नावलौकिक वाढवण्याच्या घटना घडतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.

मिथुन – महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. जीवनसाथी चांगली साथ देईल. नोकरीत हितशत्रूंपासून सावध राहा.

कर्क – जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. त्यासाठी पैसे खर्च कराल. तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल. भेटवस्तूंची देवाण घेवाण होईल. व्यवसायात भरभराट होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील.

सिंह – महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. काही अचानक किरकोळ अडचणी समोर उभ्या राहतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. जीवनसाछी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरीही तुमची नाराजी राहील. खर्चाला आवर घाला.

कन्या – मालमत्तेच्या कामात यश मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ. प्रसिद्धी नावलौकिकात भर पडण्याच्या घटना घडतील मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. प्रवास कार्य साधक ठरेल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. 

तूळ – घरी पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे आनंद होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आवडीचे पदार्थ ताटात दिसतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना नवीन संधी मिळेल.

वृश्चिक – व्यवसायात भरभराट होईल. विक्री चांगली होईल. फायद्याचे सौदे ठरतील. नवीन कल्पना अस्तित्वात येतील. व्यवसायात अभिनव उपक्रम हाती घेतले जातील. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.

धनू – धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. अचानक धनलाभ होईल. एखादे लॉटरीचे तिकिट काढून पाहण्यास हरकत नाही. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. नोकरीत तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

मकर – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. आत्मविश्वासाने कामे कराल. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. प्रेमात असाल तर घरी सांगण्यास हकत नाही. गृह सौख्य चांगले राहील.

कुंभ – खर्चाचे प्रमाण वाढते राहील. महत्त्वाच्या कामात अडथळे येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. प्रवासात दगदग होईल. नोकरीत कामाचा ताण राहील. मात्र अनेकांचे कळत नकळत सहकार्य मिळेल. त्यामुळे ताण जाणवणार नाही.

मीन – अचानक धनलाभ होईल. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. सुहृदांचे सहकार्य मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष