शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - २ मार्च २०२२; 'या' राशीच्या लोकांना मनासारखे लाभ होतील, नोकरीत बदलही संभवतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 07:34 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – अनुकूल कालखंडातील मार्गक्रमणाते सुखद परिणाम दिसून येतील. मानमरातब प्राप्त होईल. विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. कायदेशीर कटकटी दूर होतील. नोकरीतील धावपळ कमी होईल. आर्थिक आवक चांगली राहील.

वृषभ – नोकरीत बदलीची शक्यता आहे. काहींना कामानिमित्त धावपळ करावी लागेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. घरी पाहुणे येकील. काही कारणाने गैरसमज होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील काही अनुकूल फळे मिळतील.

मिथुन – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. अचानक धनलाभ मिळेल. जीवनसाथीचे सहकार्य मोलाचे ठरेल. नोकरीत सामन्य परिस्थिती राहील. थोडा कामाचा ताण वाढेल. संयम सोडू नका.

कर्क – महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. कायद्याची बंधने पाळा. संयमाने वागणे आवश्यक आहे. प्रवास शक्यतो टाळा. जीवनसाथीची मदत मिळेल. घरातील सदस्यांशी समन्वय ठेवला पाहिजे. क्रोधाला आवर घालणे गरजेचे आहे. दगदग होईल अशी कामे करू नका. 

सिंह – ग्रहमानाची साथ राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मात्र, एखाद्या कारणावरून गैरसमजही होईल. थोडा संयम ठेवलेला बरा. काही कारणाने चिडचिड होईल. पण कुणाला टाकून बोलू नका.

कन्या – आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. सबुरीने वागण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांच्या यशाच्या वार्ता समजतील. मात्र, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ द्या. प्रवासात दगदग होईल. 

तूळ – घरात आनंदी वातावरण राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. काही सोयी-सुविधा वाढवून मिळतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल.

वृश्चिक – व्यवसायात विक्री चांगली होईल. मनासारखे लाभ होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल. घरी पाहुणे येतील. नोकरीत बदल होतीस. नवी जबाबदारी अंगावर पडेल. शत्रू नामोहरम होतील. लोकांच्या आदरास पात्र ठराल.

धनू – व्यवसायात मोठ्या उलाढाली जपून करा. प्रवासात दगदग होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. घरात काही कारणाने कुरबुर होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी मन मोकळे करता येईल. गोडधोड खाण्यास मिळेल. आर्थिक आवक चांगली होईल.

मकर – जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचूनच सही करा. नेत्र विकारांचा त्रास होऊ शकतो. धनलाभ होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे काम होईल, पण त्यासाठी कष्ट करावे लागतील. आपण संयमाने वागून यश मिळवाल.

कुंभ – प्रेम प्रकरणात सावध राहा. मित्र मैत्रिणींच्या संगतीत जास्त वाहवत जाऊ नका. मनावरील ताण कमी करण्यासाठी उपासना करणे गरजेचे आहे. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. जमा खर्चाचे नियोजन नीट करा.

मीन – संमिश्र ग्रहमान राहील. आर्थिक आवक चांगली राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. दगदग होईल. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य ठरेल. कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष