शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - १ मार्च २०२२; धनलाभाच्या दृष्टीनं अत्यंत अनुकूल काळ, मालमत्तेच्या कामात यश मिळेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 07:33 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मानसन्मान प्राप्त होती. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. चांगल्या संधी चालून येतील. मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील. गृहसौख्य चांगले राहील. विविध प्रकारचे लाभ होतील.

वृषभ – भाग्याची चांगली साथ राहील. महत्त्वाच्या घटना घडतील. नावलौकिक वाढेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीत बदल होतील. कामाचा ताण वाढेल. काहींना प्रवास करावा लागेल. घरी पाहुण्या-रावळ्यांचे आगमन होईल.

मिथुन – संमिश्र ग्रहमान आहे. महत्त्वाच्या कामात दुपारनंतर यश मिळेल. प्रवासात दगदग होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. शक्यतो आराम करा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहन जपून चालना. जीवनसाथी तुम्हाला सांभाळून घेईल.

कर्क – महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा. निश्चितच यश मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. काहींना भेटवस्तू मिळतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. प्रवासात दगदग होईल. काळजी घ्या. वाहने जपून चालवा. तुमच्या शब्दाला मान राहील.

सिंह – तब्येतीकडे लक्ष द्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका. महत्त्वाच्या कामात सायंकाळनंतर यश मिळेल. ग्रहमानाच्या अनुकूलतेचा फायदा होईल. भागीदारी व्यवसाय जपून करा.

कन्या – संमिश्र ग्रहमान आहे. काही कामे सहजासहजी होतील. काही कामे रखडतील. सूर्यास्ताच्या आत महत्त्वाचे काम करून घ्या. मुलांना यश मिळेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होती. काहींना प्रवास करावा लागेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. तूळ – जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. अचानक मोछा प्रस्ताव समोर येईल. घरी पाहुणे येतील. त्यांची सरबराई करण्यात वेळ द्यावा लागेल. नोकरीत उच्चाधिकार मिळतील. घराच्या सजावटीसाठी वेळ द्याल. मनातील भावना समजून घ्या.

वृश्चिक – भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. मोठ्या उलाढाली होतील. त्यात आपल्याला फायदा होईल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. विविध प्रकारचे लाभ होतील. घरात थोडे गैरसमज होतील. नोकरीत बदलीची शक्यता आहे.

धनू – धनलाभाच्या दृष्टीनं अत्यंत अनुकूल काळ आहे. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. हाती पैसा आल्याने चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. प्रवासात काळजी घ्या. महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा.

मकर – नोकरीत अनुकूल घटना घडतील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. नावीन्यपूर्ण बदल होतील. लोकांची मदत मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. नात्यात गोडवा राहील. जमिनीचे व्यवहार जपून करा. महत्त्वाचे काम दिवसा पूर्ण करा. 

कुंभ – प्रवास शक्यतो टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल. कायद्याची बंधने पाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.

मीन – धनलक्ष्मीची कृपा राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. नातेवाईक, स्नेहीजनांची भेट होईल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष