शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

आजचे राशीभविष्य - २३ ऑक्टोबर २०२१; आपले बोलणे आणि वर्तन नियंत्रणात ठेवा नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 07:32 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - श्रीगणेश आज आपल्याला आर्थिक बाबी आणि देणे-घेणे या मुद्दयांवर जागरूक राहायला सुचवतात. वादविवादापासून दूर राहा अन्यथा कुटुंबातील सदस्या बरोबर भांडणे होतील. खाण्यापिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य खराब होईल. वेळेवर जेवणसुद्धा मिळणार नाही. व्यर्थ खर्च होतील. घरी तसेच व्यवसायात समजूतदारपणाचा दृष्टीकोन ठेवा तेच फायदेशीर राहील. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश कृपेने आपला आजचा दिवस फायद्याने भरलेला जाईल. शरीर व मनाने आज तुम्ही स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभही होऊ शकतो. कुटुंबा बरोबर आनंदात वेळ घालवाल. नवे कपडे, दागिने आज खरेदी कराल. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

मिथुन - आज आपण आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावधान राहा असे श्रीगणेश सांगतात. आपल्या बोलाचालीत काही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. त्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस खर्चाचा आहे. मनाला चिंता लागून राहील. कोणत्याही प्रकारच्या अपघातापासून सावध राहा. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्हाला लाभदायक जाईल. नोकरी धंद्यात अनुकूल वातावरण असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांबरोबर प्रवासाला जाऊ शकता. प्रिय व्यक्तींबरोबर चांगला वेळ घालवाल. आर्थिक योजना यशस्वी कराल. आणखी वाचा

सिंह - आपल्या दृढ आत्मविश्वास व मनोबल याच्या मदतीने सगळी कामे यशस्वी कराल, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसाय धंदयात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नतीचे योग येऊ शकतात. वरिष्ठांना तुमच्या कामाने प्रभावित कराल. पित्याच्या बाजूने फायदा होऊ शकतो. वाहन आणि संपत्ती या संबंधी कामे सहज पूर्ण होतील. आणखी वाचा  

कन्या - श्रीगणेश म्हणतात की, आजचा आपला दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकांच्या वार्ता समजतील, त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक सहली यासाठी खर्च होईल. बहीण- भावाकडून फायदा होण्याची शक्यता. आणखी वाचा

तूळ -  कोणत्याही नवीन कामाचा आज आरंभ न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले बोलणे आणि वर्तन नियंत्रणात ठेवा नाहीतर गैरसमज होऊ शकतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. हितशत्रूपासून सावधान. तब्येतीची चांगली काळजी घ्या. गूढ विद्येकडे आकर्षण वाढेल. सिद्धी- साधना साठी आजचा दिवस चांगला आहे. आणखी वाचा  

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आज आपण सगळा दिवस आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ मिळवाल. मित्राबरोबर कुठे तरी प्रवासास जाल. उत्तम जेवण मिळेल व नवीन आभूषणे मिळतील ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. व्यापार- भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. आणखी वाचा

धनु - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभ जाईल. स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती, आनंद यांची प्राप्ती होईल. कुटुंबिया समवेत आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर विजय मिळवाल. कार्यालयात सहकारी व हाताखलच्या व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांशी मुलाकात होईल. आणखी वाचा

मकर - आज आपण मनाने खूप अशांत व असमंजसपणाने राहाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही, त्यामुळे तणावात राहाल. श्रीगणेश सल्ला देतात की कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नका. नशीब आज तुमच्याबरोबर नाही, त्यामुळे तुम्ही निराश असाल. संतती विषयी चिंतीत असाल. घरातील थोरांची तब्बेत खराब होऊ शकते. आणखी वाचा  

कुंभ -  श्रीगणेश म्हणतात की अधिक संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन आणि अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. स्थावर- संपत्ती किंवा वाहन यांचे कागदपत्र बनवताना सावधानी बाळगा. सौंदर्य प्रसाधने, वस्त्र, आभूषणे यांच्या खरेदीसाठी महिलांचा खर्च होईल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश म्हणतात की महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज शुभ दिवस आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक आणि कलात्मक शक्ती वाढेल. मित्र, परिवारासोबत प्रवासाला जाल. भावाबहिणी कडून फायदा होईल. कामाचे यश आपले मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मान- सन्मान मिळेल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य