आजचे राशीभविष्य - २२ ऑक्टोबर २०२१, माहेरहून चांगल्या वार्ता समजतील. धनलाभ होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 08:01 IST2021-10-22T07:56:10+5:302021-10-22T08:01:41+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - २२ ऑक्टोबर २०२१, माहेरहून चांगल्या वार्ता समजतील. धनलाभ होईल
मेष - आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीय, स्नेही आणि मित्रांसमवेत स्नेहसंमेलन समारंभाला उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेण्याचा उत्साह राहील. पण अतिउत्साहाच्या भरात नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा
वृषभ - शारीरिक व मानसिक दृष्ट्या आज व्यस्त राहाल. काळजीमुळे मनावर ताण राहील. त्यामुळे मन:स्वास्थ्य मिळणार नाही. कुटुंबीयांशी पण मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. त्यामुळे घरातील वातावरण बिघडेल. आणखी वाचा
मिथुन - श्रीगणेश सांगतात की व्यापारी वर्गाला आजचा दिवस शुभफलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विवाहोत्सुकांना योग्य जीवनसाथी मिळण्याचा योग संभवतो. आणखी वाचा
कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. व्यापारी वर्गावर अधिकारी खुश राहतील. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. परिवारात सलोख्याचे वातावरण राहील. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आणखी वाचा
सिंह - आळस आणि थकवा यात आजचा दिवस जाईल. उग्र स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. संकटवर्धक विचार, वर्तन आणि नियोजन यांपासून दूर राहा. आणखी वाचा
कन्या - खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या असा श्रीगणेशाचा सल्ला आहे. अति उत्साह आणि क्रोधाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. बोलण्यावर ही संयम ठेवा. अनैतिक कामांपासून अलिप्त राहा. धार्मिक यात्रा तथा प्रवासाची शक्यता. आणखी वाचा
तूळ - आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसमवेत बाहेर जावे लागेल. छोटया प्रवासाचा बेत आखाल. व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल. आणखी वाचा
वृश्चिक - सर्व दृष्टींनी आजचा दिवस सुखात जाईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल.शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरदारांना सहकारी सहकार्य करतील. माहेरहून चांगल्या वार्ता समजतील. धनलाभ होईल. आणखी वाचा
धनु - श्रीगणेश आज आपणाला रागावर नियंत्रण ठेवायला सांगतात. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती स्वास्थ्य राहील. आणखी वाचा
मकर - प्रतिकूलतेने भरलेला आजचा दिवस जाईल असे श्रीगणेश सांगतात. स्फूर्तीचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी तंटा बखेडा किंवा निरर्थक चर्चेचे प्रसंग येतील. त्यामुळे मन व्यथित राहील. आणखी वाचा
कुंभ - आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी होईल असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. तब्बेत पण चांगली राहील. परिवारात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा
मीन - मनातून नकारात्मक विचार काढून टाका. रागावर आणि वाणीवर ताबा ठेवा. कोणाशी वादविवाद किंवा तंटा बखेडा टाळण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा