शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

आजचे राशीभविष्य - २१ ऑक्टोबर २०२१, व्यापारी वर्गाच्या मिळकतीत भर पडेल, नोकरीमध्ये वरिष्ठांची कृपादृष्टी राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 07:35 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... 

मेष - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस आपल्याला पूर्ण अनुकूल आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न असाल. आर्थिक क्षेत्रातही लाभ होईल. मित्र आणि सगे सोयरे यांना भेटून घरातील वातावरण आनंदमय राहील. आणखी वाचा

वृषभ - आज सावधगिरीने राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. स्नेही आणि कुटुंबीय यांच्याशी मतभेद झाल्याने तुम्ही दुःखी असाल. आणखी वाचा 

मिथुन - आपला आजचा दिवस विविध लाभ प्राप्त करून देणारा ठरेल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात पत्नी आणि मुलांकडून फायदयाच्या बातम्या कळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या मिळकतीत भर पडेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आणखी वाचा 

कर्क -  नोकरी व्यवसाय करण्यार्‍यांना आजचा दिवस खूप लाभदायक आहे असे श्रीगणेश म्हणतात. नोकरीत पदाधिकारी तुमच्यावर खूश असतील त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांबरोबर महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा कराल. मन ताजे तवाने राहील. आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मध्यम फल देणारा जाईल. धार्मिक आणि मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. धार्मिक प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. पोट दुखीचा त्रास संभवतो. परदेशात राहणार्‍या आप्तांच्या बातम्या समजतील.  आणखी वाचा   

कन्या - आज नवीन कामे सुरू न करण्याचे श्रीगणेश सांगतात. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट बनेल. म्हणून बोलण्यावर ताबा ठेवा. कुटुंबातील व्यक्तींबरोबर मतभेद संभवतात. पाण्यापासून जपा. आणखी वाचा 

तूळ -  आजचा संपूर्ण दिवस साफल्याचा व आनंदाचा असेल ज्यामुळे पूर्ण दिवस आनंदच अनुभवाल. सार्वजनिक जीवनासंबंधीच्या कार्यात सफलता मिळवाल. भिन्नलिंगी व्यक्तीचा आज तुमच्यावर प्रभाव राहील. मौजमजे साठी खर्च होईल. नवीन वस्त्र अलंकार खारेदी कराल.  आणखी वाचा   

वृश्चिक -   आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या मुलाकाती रद्द झाल्याने निराश व क्रोधीत बनाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. मातुल घराकडून काही बातमी मिळाल्याने मन व्यथित होईल. आणखी वाचा 

धनु - श्रीगणेश आजचा मिश्रफलदायी दिवस असल्याचे सांगतात. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य आणि अभ्यास यामुळे चिंतित राहाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्‍या रागावर नियंत्रण ठेवा. प्रणयासाठी मात्र योग्य वेळ आहे. प्रिय व्यक्ती बरोबर रोमांचक क्षण अनुभवा.  आणखी वाचा 

मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस प्रतिकूलतेने भरलेला आहे, त्यामुळे मन खिन्न राहील. शारीरिक स्फूर्ती, तरतरी यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. आणखी वाचा   

कुंभ -  आज आपण तना-मनाने प्रसन्न असाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदा बरोबर एकत्र येऊन नवीन योजना ठरवाल. त्यांच्या बरोबर आनंदात वेळ जाईल. लहान प्रवास होतील.  आणखी वाचा 

मीन -  श्रीगणेश आज तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवायला सांगतात. रागामुळे कोणाशी तक्रार किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्याकडे लक्ष द्या. कुटुंबातील सदस्य आणि प्रियजन यांच्याकडून घरात विरोधी वातावरण राहील.  आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य