शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

आजचे राशीभविष्य - २० ऑक्टोबर २०२१, अचानक धनलाभ आपली काळजी दूर करेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 07:42 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... 

मेष - कमी वेळात अधिक लाभ' या विचारात फसणार नाही याची दक्षता घ्या. कोर्ट- कचेरी प्रकरणात पडू नका. कोणाला जामीन राहू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. चित्ताची एकाग्रता कमी राहील. तब्बेतही सांभाळा. पैशाच्या देवाण- घेवाणीत लक्ष द्या. दुर्घटनेपासून जपा.  आणखी वाचा 

वृषभ - घर आणि संतती संबंधी शुभ वार्ता आपणाला मिळतील असे श्रीगणेश सांगतात. जुन्या, बालपणच्या मित्रांच्या भेटीने मनाला आनंद होईल. नवीन मित्र पण मिळतील. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपारनंतर सांभाळून राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस पूर्णतः अनुकूल आणि लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात वरिष्ठांची कृपादृष्टी असल्याने आपला प्रगतीचा मार्ग निर्विघ्न होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील आणि वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. आणखी वाचा 

कर्क -   वरिष्ठ अधिकार्‍यांशी उक्ती आणि कृती या दृष्टीने सांभाळून वागा, असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपारनंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. आणखी वाचा 

सिंह - आज संताप आणि वाचा यांवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. तब्बेतही सांभाळा. सरकार विरोधी घटनांपासून दूर राहा. मानसिक व्यग्रता राहील. घरातील व्यक्तींशी भांडणे होतील. ईष्टदेवता स्मरण आणि आध्यात्मिकतेचे आचरण हाच त्यावर तोडगा आहे. आणखी वाचा  

कन्या -  सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे व मनोरंजन यांत आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपारनंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. त्याच बरोबर अचानक धनलाभ आपली काळजी दूर करेल. आणखी वाचा 

तूळ - आज दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल असा श्रीगणेशाचा आशीर्वाद आहे. गृहस्थी जीवनात सुख- शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य राहील. स्वभाव उग्र बनेल. सबब वाणीवर ताबा ठेवा.  आणखी वाचा 

वृश्चिक - मानसिक दृष्ट्या हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल राखण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. अभ्यास आणि करिअर या संबंधी विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती आणि साहित्य निर्मिती यांत नावीन्य मिळेल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील. आणखी वाचा 

धनु -  कुटुंबातील शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद- विवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आईची तब्बेत बिघडेल असे संकेत आहेत. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपारनंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल. आणखी वाचा 

मकर - महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ विचार आणि स्थिरता यांना अग्रस्थान द्यावे. मित्र आणि प्रिय व्यक्तींच्या भेटीमुळे आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपारनंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ राहील.  आणखी वाचा 

कुंभ -  आज राग आणि बोलणे यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या- पिण्यात संयम बाळगा. दुपारनंतर वैचारिक स्थिरता येईल. आणखी वाचा 

मीन -  आजचा आपला दिवस शुभ फलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहून उत्साही बनाल. नवीन कार्यारंभ करायला अनुकूल दिवस आहे. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवासाचे योग आहेत.  आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य