शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - १८ ऑक्टोबर २०२१, शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी- व्यवसायात कामाची प्रशंसा होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 08:24 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... 

मेष - अत्यंत सावधपणे आजचा दिवस घालवा असा सल्ला श्रीगणेश देतात. सर्दी, खोकला आणि ताप यामुळे तब्बेत बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. दानधर्म करण्यात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल. सबब सांभाळून राहा. मानसिक बेचैनी राहील. आणखी वाचा 

वृषभ - आज आपणावर श्रीगणेशाची पूर्ण कृपा राहील. परिवारात सुख आणि शांती राहील. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात आणि व्यापार धंद्यात वाढ होईल. रम्य स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल. आणखी वाचा 

मिथुन - श्रीगणेश कृपेने आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रोत्साहन मिळेल. बढतीचा योग आहे. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल.  आणखी वाचा 

कर्क - आज आपण धर्म, ध्यान, देवदर्शन यात जास्त वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग येईल. शारीरिक व मानसिकदृष्टया प्रसन्न राहाल. भाग्योदयाची संधी मिळेल. घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा 

सिंह -  श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा दिवस प्रतिकूलतांचा आहे. तब्बेतीकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे- पिणे टाळा. आजारामुळे खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडतील. कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहा. आण

कन्या - श्रीगणेश कृपेने आजचा आपला दिवस अनुकूलतापूर्ण राहील. जीवनसाथी बरोबर जवळीकेच्या क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्यजीवनात गोडी राहील. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान- प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा 

तूळ - घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश आणि सफलता मिळेल. तब्बेत चांगली राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. मातुल घराण्याकडून वार्ता येतील. आणखी वाचा

वृश्चिक - तब्बेती विषयी थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर- सट्टायात न पडण्याची सूचना श्रीगणेश देतात. शक्यतो यात्रा, प्रवास यात जपून राहा. आणखी वाचा 

धनु - शरीर आणि मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या तब्बेतीसंबंधी चिंता राहील. सार्वजनिक दृष्ट्या आपला मानभंग होऊ नये याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

मकर - दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. गृहस्थी जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार- धंद्यात आर्थिक लाभ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा 

कुंभ - वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल असे श्रीगणेश सांगतात. वाद-विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. समाधानाची भावना अनुभवाल. आणखी वाचा 

मीन - आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस चांगला आहे. नातलग, संबंधित आणि मित्र यांच्याशी भेट- संवाद घडतील. त्यांच्या समवेत बाहेर फिरायला वा जेवणासाठी जाण्याची संधी येईल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य