शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

आजचे राशीभविष्य - ५ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी नवीन काम सुरू करायला आजचा दिवस उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 07:54 IST

Todays Horoscope 5 November 2020 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष -विचारांची अस्थिरता अडचणीत आणेल. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण निर्णय न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

वृषभ -फसव्या व्यवहारामुळे संघर्षात पडण्याचा संभव आहे. लेखक, कारागिर, कलाकार यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. वाकचातुर्य आज तुमचे काम यशस्वी करेल व दुसर्‍याला मोहून टाकेल. नवीन कामाला सुरूवात करण्यासाठी दिवस चांगला नाही असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मिथुन -आजचा दिवस लाभदायक जाईल अशी आशा करू शकता. सकाळपासूनच उत्साह आणि प्रसन्नता अनुभवाल. आर्थिक लाभ मिळेल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल, असे श्रीगणेश सांगतात. सगळ्यांबरोबर मिळून आनंददायक प्रवास ठरवण्याचीही शक्यता आहे. आणखी वाचा 

कर्क -मनाची साशंकता व द्विधा निर्णय घ्यायला अतिशय कठिण करून सोडेल. कुटुंबीया बरोबर मतभेद झाल्याने मन उदास होईल. आईच्या स्वास्थ्याची चिंता लागून राहील. पैसा खर्च होईल. गैरसमज व वाद-विवाद यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

सिंह -श्रीगणेश म्हणतात की आज आपल्याला विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गहाळ राहिलात तर लाभापासून वंचित राहाल, तिकडे लक्ष द्या. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग व थोरामोठयांकडून लाभ होतील. नोकरी व्यवसायात पदोन्नतीचा संभव आहे. आणखी वाचा

कन्या -नवीन काम सुरू करायला निर्मित योजना अमलात आणायला आज उत्तम दिवस आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरदारांची पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात ताळ- मेळ असेल. सरकारी कामेपूर्ण होतील. आणखी वाचा

तूळ -संतती आणि स्वास्थ्य या संबंधी चिंता लागून राहील. नोकरी करणार्‍यांना वरिष्ठ किंवा सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. विरोधी किंवा प्रतिस्पर्धी यांच्याबरोबर सखोल चर्चा करू नका, असा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा

वृश्चिक -गणेश सांगतात की आजचा दिवस सावधानीपूर्वक व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध आणि अनैतिक आचरण तुम्हाला अडचणीत आणतील. राजकीय अपप्रवृत्ती पासून दूर राहण्याचा व नवीन संबंध विकसित करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. दुर्घटनेपासून दूर राहा. आणखी वाचा

धनु -बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय आणि लेखन कार्य या साठी शुभ दिवस आहे. मनोरंजन, प्रवास, मित्राबरोबर भेटी, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्न लिंगीया बरोबर जवळीक या गोष्टी आजचा दिवस आनंदित बनवतील. सार्वजनिक मान- सन्मान वाढेल. आणखी वाचा

मकर -श्रीगणेशांच्या कृपेने व्यापार धंद्यात वाढ होईल. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस असल्यामुळे पैशाच्या देवाण घेवाणीत सरळपणा राहील. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबीत लोकांचे सहकार्य मिळेल. मात्र फायद्याच्या गुंतागुंतीपासून सावध राहा, असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

कुंभ -आज तुम्ही संतती व स्वतःचे स्वास्थ्य या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. प्रवासात अडचणी येतील. म्हणून शक्य असेल तर प्रवास स्थगित करावेत असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचामीन -शारीरिक व मानसिक भय वाटेल.नको त्या घटनामुळे तुमचा उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन आणि कीर्ती यांची हानी होईल. स्त्रीवर्ग तसेच वाणी यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. स्थावर मिळकत, वाहन इ. च्या समस्या होऊन चिंता वाढेल. आणखी वाचा 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्य