शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आजचे राशीभविष्य, ३ जून २०२१; कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 07:31 IST

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष - लक्ष्मीकृपेचा आज आपल्यावर वर्षाव होईल असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक पातळीवर यश आणि कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहोत्सुकांना यश मिळेल. आणखी वाचा 

वृषभ - श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसायात अनुकूल स्थिती. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सरळ पार पडतील आणि त्यांच्यापासून लाभ होईल. आणखी वाचा

मिथुन - प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. आनंददायक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य पण चांगले असेल. आणखी वाचा 

कर्क - अनैतिक आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य सतावेल. दुपारनंतर परदेशातून वार्ता येतील. संततीविषयक काळजी राहील.  आणखी वाचा 

सिंह - आज आपणाला मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील असे गणेशजी सांगतात. मित्र आणि स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीचा आनंद लुटाल. दुपारनंतर मात्र खूप विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. आणखी वाचा 

कन्या - गणेशजी सांगतात की आजचा दिवस आपणाला शुभ जाईल. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. आणखी वाचा 

तूळ -  लेखनकार्य आणि सृजनशीलता या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे असे गणेशजी सांगतात. बौद्धिक चर्चेतून लाभ होण्याविषयी आपण विचार कराल. त्यात यशही मिळेल. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. आणखी वाचा 

वृश्चिक - आज हट्ट सोडा असे गणेशजी सुचवितात. भावनेच्या आहारी जाऊ नका. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आर्थिक नियोजन कराल. वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. आईकडून लाभ मिळेल. आणखी वाचा 

धनु - आज मन उत्साहित राहील व हल्केपणा जाणवेल. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्यनिर्णय ध्याल. मित्रांशी संबंध वाढतील आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भाग्यवृद्धीचे योग आहेत. दुपारनंतर मात्र जास्त संवेदनशील बनाल.  आणखी वाचा 

मकर -  आज धार्मिक विचारांबरोबर धार्मिक कार्यावरही खर्च होईल. वादविवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होऊ नये याकडे लक्ष द्या. परिवारातील सदस्यांचे मन दुखावेल व ते नाराज होतील. दुपारनंतर मनातील चिंता दूर होतील. आणखी वाचा 

कुंभ - आज आपले मन आनंदी राहील असे गणेशजी सांगतात. गहन चिंतनशक्ती आणि आध्यात्मिकता यात मन गुंतून जाईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. उक्तीवर संयम ठेवा. अचानक उद्भवणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा 

मीन - कोणाशी आर्थिक व्यवहार करू नका व वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेशजी देतात. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुप्रसंग उद्भवतील. दुपारनंतर तब्बेतीत सुधारणा होईल. मनःस्वास्थ्यही मिळेल. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य