शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

आजचे राशीभविष्य - 29 सप्टेंबर 2021; नोकरीत सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल, शत्रूवर मात कराल, धनलाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 07:32 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - श्रीगणेशांच्या दृष्टीने आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी आहे. मनात शीघ्र बदल होतील व मन द्विधा बनेल. आज नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. निश्चित हेतूने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. छोटे प्रवास होतील. महिलांनी आज वाणीवर संयम ठेवावा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आणखी वाचा

वृषभ - हाती आलेली संधी अनिर्णायकतेमुळे आपण आज गमावून बसाल आणि संधीचा लाभ घेता येणार नाही असे श्रीगणेश सुचवितात. विचारांत व्यस्त राहाल. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. आपल्या वाकचातुर्यामुळे इतरांना शांत करू शकाल. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश यांना वाटते की आज आपल्या दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन आणि स्वस्थचित्ताने होईल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टीने लाभदायक दिवस. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याची सूचना श्रीगणेश देतात. मित्र तथा प्रिय व्यक्तिंकडून भेटवस्तू मिळाल्याने मन आनंदी बनेल. आणखी वाचा

कर्क - मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कोणताही अंतिम निर्णय घेऊ शकणार नाही. असमंजसपणामुळे मनाला यातना होतील. संबंधितांचे गैरसमज होतील. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. भांडण, मारामारी यांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. आरोग्य बिघडेल आणि पैसा खर्च होईल. आणखी वाचा 

सिंह - आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी गमावाल असा इशारा श्रीगणेश देतात. मन विचारात गढून जाईल. नवे कार्य हाती घेऊ नका. मित्रांबरोबर सहलीचा बेत आखाल. त्यात फायदा होईल. धनलाभ होईल. आणखी वाचा

कन्या - गणेशजी म्हणतात की आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. नवीन कार्ये आज सफल होतील. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी फायद्याचा दिवस. त्यांना पदोन्नती मिळू शकते. वरिष्ठ अधिकार्‍याकडून फायदा होईल. सरकारी कामे होतील. सरकार कडून फायदा होईल. ऑफिसकामासाठी बाहेरगावी जावे लागेल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील. आणखी वाचा

तूळ - आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यग्र असाल, असे गणेशजी म्हणतात. नवीन कार्यारंभास शुभ दिवस दूरचा प्रवास, धार्मिक स्थळांना भेटीचा आज योग आहे. व्यवसाय धंद्यात फायदा. परदेशातील मित्रांचे समाचार मिळतील. संततीविषयी द्विधा मनःस्थिती राहील. विरोधकाबरोबर चर्चा सुरु करण्याची सूचना श्रीगणेश देतात.आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस सावधतेने घालविण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. नवीन कार्याची सुरुवात करु नका. तसेच रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामकृत्या पासून दूर राहा. राजकीय गुन्ह्यापासून दूर राहा. ईश्वरी आराधना व नाम स्मरणाने फायदा होईल. आणखी वाचा

धनु - आजचा आपला दिवस आनंदात व समाधानात जाईल असे श्रीगणेश सांगतात. मनोरंजन, पार्टी, पिकनिक, प्रवास, सुग्रास भोजन व सुंदर वस्त्र प्रावरणेही आजच्या दिवसाची विशेषता असेल. बौद्धिक विचारांची देवाणघेवाण होईल. भागीदारीत फायदा. प्रसिद्धी मिळेल. वैवाहिक सुख उत्तम राहील. आणखी वाचा

मकर - व्यापार धंद्यात वाढ होईल असे श्रीगणेश सांगतात. त्यादृष्टीने पुढे वाटचाल करा. पैशाचे व्यवहार सहज होतील. आवश्यक ठिकाणीच पैसा खर्च होईल. नोकरीत सहकार्यांकडून सहकार्य मिळेल. परदेशाशी व्यापार वाढेल. शत्रूवर मात कराल. आरोग्य चांगले राहील. आणखी वाचा

कुंभ - आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करण्याची सूचना श्रीगणेश देतात. आज विचारात बदल दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. संतती विषयी काळजी राहील. लेखन व नवनिर्माण या कामासाठी चांगला दिवस. पोटाच्या तक्रारीची काळजी घ्या. आणखी वाचा

मीन - नावडत्या घटनांमुळे आजचा दिवस उत्साहात जाणार नाही असे श्रीगणेश सांगतात. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. स्त्रियांबरोबर व्यवहार करताना काळजी घ्या. पैसा आणि कीर्ती यांची हानी. नोकरदारांना नोकरीत चिंता. स्थावर मालमत्ता, वाहन यासंबंधीच्या कागदपत्रांविषयी सावधानता बाळगा. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष