शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

आजचे राशीभविष्य - 27 एप्रिल 2022; अचानक धनलाभ होण्याची शक्यता, प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 10:36 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - धार्मिक कार्यात मन रमेल. काही तरी चांगले करून दाखवण्याची जिद्द राहील. तीर्थयात्रा, चांगला प्रवास घडेल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. व्यवस्थित आराम करा. दगदग होईल, अशी कामे करू नका, चौरस आहार घ्या. 

वृषभ - विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, आर्थिक व्यवहार जपून करा. काही व्यवहारात गोपनीयता बाळगण्याचे धोरण ठेवा. नोकरीत कुणी तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल. थोडे सावध राहा. कामाचा फारसा ताण राहणार नाही. मिथुन - नोकरी, व्यवसायात अनुकूल बदल होतील. त्यातून तुमचा फायदा होईल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल उच्च अधिकार मिळतील. पगारवाढ होईल सुविधा वाढवून मिळतील, वरिष्ठांची मर्जी राहील. घरी पाहुण्या-रावळ्यांची लगबग राहील .

कर्क - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे दुपारच्या वेळी हाती घ्या. भाग्याची चांगली साथ राहील एखादी सुवार्ता कानावर पडेल. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. तुमचे महत्त्व वाढेल एखाद्या प्रकरणात मध्यस्थी कराल. 

सिंह - महत्त्वाचे काम सकाळच्या सत्रात करून घ्या. अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. नोकरीत अनुकूल स्थिती राहील

कन्या - दुपारपासून सकारात्मक अनुभव येण्यास सुरुवात होईल महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रवास होतील. नवीन ओळखी होतील आर्थिक आवक चांगली राहील. भावंडांशी सख्य राहील, प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.

तुळ - प्रगतीच्या संधी येतील. मात्र, विघ्नसंतोषी लोकांमुळे मनस्ताप सहन करावा लागेल. नोकरीत हितशत्रू कारवाया करतील. आपले सगळे पत्ते खुले करून दाखवू नका. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. मात्र, मुलांच्या संगतीकडे नीट लक्ष द्या. 

वृश्चिक - मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल चांगल्या संधी चालून येतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीतील अस्थिरता कमी होईल. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. नशिबाची अनुकूलता राहील. काहींना प्रवास करावा लागेल, 

धनू - ग्रहांची भ्रमणे अनुकूल राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. घरी मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील, व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत मोठी संधी मिळेल, वरिष्ठाची मर्जी राहील, तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.

मकर - व्यवसायात विक्री चांगली होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. शुभ वर्तमान कळेल. तीर्थयात्रा, पर्यटनस्थळांना भेटी देणे या निमित्ताने प्रवास होईल. भावंडांशी सुसंवाद निर्माण होईल. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. जुनी येणी वसूल होतील. 

कुंभ - घरात सौहार्दाचे वातावरण राहील. आवडते पदार्थ ताटात दिसतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. घर, शेतीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आनंदी विचार राहतील. 

मीन - महत्त्वाचे काम सकाळच्या सत्रानंतर हाती घ्या. अडचणी दूर होतील, मनात प्रसन्न विचार राहतील जीवनसाथीशी सूर जुळतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल.

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष