शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

आजचे राशीभविष्य - 30 सप्टेंबर 2021: 'या' तीन राशींच्या लोकांना आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या, इतरांसाठी कसा असेल आजचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 07:36 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - श्रीगणेश आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा देतील. तथापि विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. त्याचा फायदा मिळेल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

वृषभ - मनाची दोलायमान अवस्था महत्त्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल, असे श्रीगणेश सांगतात. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना फार चांगला काळ आहे. आणखी वाचा

मिथुन -  आजचा दिवस उत्साह आणि स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र आणि आप्तयांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्यजीवनात सुखा-समाधानाची भावना राहील. आर्थिक लाभ आणि नियोजन यासाठी अनुकूल दिवस. आणखी वाचा

कर्क - परिवारात मतभेदाचे प्रसंग येतील. त्यामुळे मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तब्बेत बिघडेल. आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. स्त्री वर्गाशी मुलाकात होईल व ती लाभदायक ठरेल. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील. व्यापारवृद्धी होईल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. बाहेर जाण्याचा बेत ठरवाल. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश कृपेने नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान- सन्मान वाढेल. सरकार कडून लाभ होईल. वसुली किंवा व्यावसायिक कामानिमित्त बाहेर जावे लागेल. आणखी वाचा

तूळ - बुद्धिवादी आणि साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास किंवा तीर्थस्थानाला भेट द्याल. परदेशगमनाच्या संधी येतील व परदेश स्थित स्नेह्यांकडून वार्ता मिळतील. संततीच्या समस्या मनात चिंता वाढवतील असे श्रीगणेश सांगतात.आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की उक्ती आणि कृती यांवर आज संयम ठेवा. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे- पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. त्यामुळे मानसिक शांती मिळण्या बरोबरच व्याधी दूर राहतील. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश म्हणतात की पार्टी, पिकनिक, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्न लिंगीय व्यक्तीशी रोमांचक मुलाकात होईल. बौद्धिक, तार्किक विचार विनिमय होईल. भागीदारी मध्ये लाभ होईल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस व्यापार धंद्यातील प्रगती आणि आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. वसुली तसेच पैशांच्या देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात- निर्यातीचा व्यापार करणार्‍यांना फायदा होईल. आर्थिक लाभ होतील. तब्बेत चांगली राहील. विरोधकांचे प्रयास निष्प्रभ होतील. आणखी वाचा

कुंभ - मानसिक अशांतता आणि उद्विग्नता यांनी भरलेला दिवस आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संततीचे प्रश्न बेचैन करतील. पोटाच्या तक्रारी मुळे हैराण व्हाल. साहित्य लेखनासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस दक्षता बाळगण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची तब्बेत हा चिंतेचा विषय होईल. तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी आणि मानहानी होईल. स्त्रियां बरोबरचे संबंध हानीकारक सिद्ध होतील. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष