शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

आजचे राशीभविष्य - 17 फेब्रुवारी 2022; धनलक्ष्मीची कृपा राहील, जोडीदाराच्या मर्जीने वागा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 07:58 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. जवळचे प्रवास होतील. जोडीदाराच्या मर्जीने वागा. सकारात्मक विचार करा. 

वृषभ - नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. महत्त्वाच्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. काहींना कामानिमित्त प्रवास घडून येतील, नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. घरी पाहुणे येतील. जीवनसाथीची काळजी घ्या. अचानक धनलाभ होईल. 

मिथुन - व्यवसायात बरकत राहील. मालाची विक्री जोरात राहील. जवळच्या प्रवासाचा योग येईल. भावंडांच्या भेटी होतील. मालमत्तेच्या कामाविषयी प्रगती होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. क्रोधाला आवर घालणे आवश्यक आहे. आर्थिक प्रश्न सुटतील.

कर्क - तुमचे महत्त्व वाढेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे भोजन मिळेल. क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलांशी संवाद साधा. घरातील एखाद्या सदस्याशी वाद होतील. 

सिंह - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सगळ्या अडचणी दूर होतील. मुलांची काळजी घ्या. त्यांचे कौतुक करतानाच त्यांच्या अभ्यासाचा व उपक्रमांचा आढावा घ्या. त्यांना वेळापत्रक आखून द्या. सकारात्मक विचार कराल. 

कन्या - महत्त्वाच्या  कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. काहींना प्रवास करावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आवक चांगली राहील, मात्र अर्थार्जनासाठी दगदग होईल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.  तूळ - धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. नोकरीत एक पाऊल पुढे पडेल. विविध प्रकारचे लाभ होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल, मनात आनंदी विचार राहतील. 

वृश्चिक- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. अधिकारात वाढ होईल. तुमचे वर्चस्व राहील. घरी पाहुणे येतील. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. 

धनु - भाग्याचे पाठबळ मिळेल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. अडचणी दूर होतील. प्रवास कार्यसाधक ठरतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. आर्थिक अडचणी दूर होतील. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील.

मकर - जमिनीचे व्यवहार जपून करा. जीवनसाथीची काळजी घ्या. काय हवे नको ते पाहा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळलेला बरा. दगदग होईल अशी कामे करू नका. वाहने जपून चालवा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. 

कुंभ - विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. मनासारखी आवक राहील. मालमत्तेच्या कामात फायदे होतील भेटवस्तू मिळतील, मित्र मैत्रिणींच्या सहवासात मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. जीवनसाथीशी सूर जुळतील. 

मीन - मुलांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. आरोग्याची काळजी घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष