शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 15 जुलै 2021; कुणाबरोबर तरी भावनिक संबंध दृढ होतील, मन शांत होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 07:41 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - साहित्य निर्मिती आणि कलात्मक अभिव्यक्ती वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांच्या भावनांशी आपल्या भावनांचा संघर्ष होईल.  आणखी वाचा

वृषभ - आईच्या तब्बेतीविषयी आज चिंता राहील. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार सोडून द्या. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. हातून एखादे धार्मिक कार्य घडेल.आणखी वाचा

मिथुन - कार्य यशस्वी झाल्याने आपले मन आज आनंदी असेल. तुमच्याकडून प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. परंतु दुपारनंतर घरात मतभेद होतील. कुटुंबियांशी झालेल्या वादातून मन खिन्न बनेल. आईची प्रकृती बिघडेल. दुपारनंतर भाग्यवृद्धीचे संकेत आहेत. आणखी वाचा

कर्क - दीर्घकालीन योजनेच्या आयोजनासंबंधी विचार करताना मनःस्थिती द्विधा होईल. कुटुंबियांसोबतचे वातावरण तणावपूर्ण असेल. ठरवलेल्या कामात अपेक्षित यश मिळेल असे गणेशजी सांगतात. भावा बहिणीकडून लाभ मिळेल. कुणाबरोबर तरी भावनिक संबंध दृढ होतील व त्यामुळे मन शांत होईल. आणखी वाचा 

सिंह - आज आपल्यामनात पक्का आत्मविश्वास असेल असे श्रीगणेशजी म्हणतात. आज आपले प्रत्येक काम दृढ निर्णयशक्तिनी पूर्ण असेल. तरीही मनात क्रोधाची भावना अधिक असेल, म्हाणून मन शांत ठेवा. सरकारी कामातून फायदा मिळेल. मिळकतीपेक्षा खर्च जास्त होईल.  आणखी वाचा

कन्या - आज आपले मन खूप भाऊक बनेल. भावनेच्या आहारी जाऊन काही अविचारी काम आपल्या हातून होऊ नये यासाठी सावध रहा. दुपारनंतर तुमच्यात आत्मविश्वास वाढतोय असे लक्षात येईल. समाजात मान वाढेल, प्रतिष्ठा मिळेल. तरीही क्रोध आवरा. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस आपल्याला प्रवास- सहलीला जाण्याचा तसेच मित्रांकडून फायद्याचा आहे. व्यापारात लाभ होईल. अधिक संवेदनशील होऊ नका असे गणेशजी सांगतात. तीव्र वाद- विवादापासून सांभाळून. भ्रमापासून दूरच रहा. फायद्याविषयीचे निर्णय सांभाळून घ्या.आणखी वाचा

वृश्चिक - मनोबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज प्रत्येक काम सहजपूर्ण होईल. व्यापार- धंदयात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. वडीलां बरोबर आपले संबंध चांगले राहतील व त्यांच्याकडून फायदाही संभवतो. दुपारनंतर आपण काही विचारात गुरफटाल. व्यापारात लाभाचे योग. मित्रांकडूनही फायदा होईल. आणखी वाचा

धनु - आज आपली वृत्ती धार्मिक बनेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल. न्यायप्रिय बनाल हानिकारक कामापासून दूर रहा.  तुमची कामे सहजगत्या पूर्ण होतील. व्यवसाय धंद्यात वरिष्ठ, प्रोत्साहन मिळाल्यामुळे पदोन्नती देतील. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस सांभाळून रहा, असे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीविषयी निष्काळजी राहू नका व नकारात्मक विचारांना वरचढ होऊ देऊ नका. असे केले तरच आपण हानीतून बाहेर पडाल.  एखाद्या दुसच्या धार्मिक स्थळाला भेट दिली तर मनाला शांती मिळेल. स्वभाव उग्र व संतापी बनेल, तरी त्यावर संयम ठेवा. आणखी वाचा

कुंभ - आज लहानसहान गोष्टींवरुन वैवाहिक जीवनात गोष्टी विकोपाला जाऊ शकतात, असे श्रीगणेश सुचवतात. संसारातील प्रश्नांविषयी आज आपण उदासीन रहाल. कोर्ट-कचेरी पसून जरा जपूनच.  नवीन कामाची सुरुवात करा असा गणेशजींचा आपल्याला सल्ला आहे. स्फूर्ती आणि प्रसन्नतेचा अभाव राहील व मनाला उद्विग्नता येईल. ईश्वरभक्ती, अध्यात्मिकता मनाला शांती देईल. आणखी वाचा

मीन - आज मन चिंतामुक्त राहील. शंकाकुशंकामुळे प्रसन्नता जाणवणार नाही. कार्यांत विघ्ने आल्याने कार्य पूर्ण होण्यास वेळ लागेल. सहकार्यांकडून सहकार्य मिळणार नाही. वैवाहिक जीवनात कटकटीचे वातावरण लांबणार नाही याची काळजी घ्या. व्यापारांतील भागीदारांपासून संभाळूनच रहा. संसारातील विषयांपासून मन अलिप्त राहील. आणखी वाचा

 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष