शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

आजचे राशीभविष्य - 3 ऑक्टोबर 2021; तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे योग; जाणून घ्या, काय सांगते तुमची राशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 07:35 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. स्वास्थ्य जेमतेम राहील. शारीरिक थकवा जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्या. तब्बेत सांभाळा कारण पोटाच्या तक्रारी उदभवतील. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. पैतृक संपत्ती पासून लाभ होण्याचे योग आहेत. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. कारण त्यांना कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. संततीसाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस चांगला आणि आनंददायी जाईल. भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक दृष्ट्या सावध राहा. श्रीगणेश गुंतवणूकदारांना इशारा देतात की सावधपणे पैसे गुंतवा. मन चंचल राहील. त्यामुळे विचार क्षणात बदलतील. विरोधकांना नामोहरम कराल. आनंद, उल्हास आणि भाग्योदयपूर्ण दिवस आहे. आणखी वाचा

कर्क - आज मध्यमफलदायी दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. तब्बेत ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळणार नाही. सर्व प्रकारच्या अवैध बाबींपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा 

सिंह - आजचा दिवस शुभ फलदायी जाईल. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील आणि वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. संताप वाढेल. पोटदुखीचा त्रास संभवतो. सबब खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. पूर्ण दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

कन्या - दिवसभर शारीरिक आणि मानसिक चिंतेच्या दबावाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. कोर्ट-कचेरी संबंधी सावध राहा. अचानक खर्च उद्भवतील. शांत चित्ताने काम करा. संतापामुळे कामात व्यत्यय येईल. मानसिक बेचैनी राहील. तब्बेतीकडे लक्ष पुरवा. नोकरीदारांनी हाताखाली काम करणारांपासून सावध राहावे. आणखी वाचा

तूळ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभफलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी होतील आणि रम्यस्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीचे योग आहेत. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. स्त्रियांकडून फायदा होईल. वैवाहिक सुख मनासारखे मिळेल.आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शुभफलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थजीवनात आनंद व उल्हास राहील. विनाविलंब सर्व कामे पूर्ण होतील. मान-सम्मान मिळेल. नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल. तब्बेत चांगली राहील. धनलाभाचे योग. व्यापारीवर्गाला व्यापारानिमित्त बाहेर जाण्याचे योग आहेत. मित्र व संबंधितांकडून लाभ होतील. संततीची समाधानकारक प्रगती होईल. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश आपणांस यात्रा- प्रवास स्थगित करण्याची सूचना देत आहेत. शरीरात थकवा जाणवेल. तब्बेतही यथातथाच राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. जोखमीच्या कामापासून दूर राहा. कार्यसाफल्याचे योग कमी आहेत. वरिष्ठांशी संघर्ष होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. आणखी वाचा

मकर - ऑफिस तथा व्यवसाय क्षेत्रात आज परिस्थिती अनुकूल राहील असे श्रीगणेश सांगतात. ऑफिसमधील कार्य कुशलतेने कराल. व्यावहारिक व सामाजिक कामानिमित्त बाहेर जाण्याची संधी मिळेल. संताप आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहा. श्रीगणेश सूचना देतात की नवीन काम आज सुरू करू नका. आणखी वाचा

कुंभ - आज आपणात खंबीर मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंग दिवस आनंदी बनवतील. भिन्न व्यक्तींशी परिचय होतील आणि मैत्री वाढेल. विवाहितांना वैवाहिक सुख चांगले मिळेल. समाजात मान- सम्मान वाढेल. वाहनसुख मिळेल. श्रीगणेशाच्या आशीर्वादामुळे भागीदारीत लाभ होतील. आणखी वाचा

मीन - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभ फलदायी राहील. दृढ मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण असेल. तरी बोलण्यात मर्यादा आणि वर्तनात नम्रता ठेवा. माहेरहून वार्ता येतील. सहकारी आणि नोकरांकडून सहकार्य चांगले मिळेल. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष