शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 18 जुलै 2021; अचानक धनलाभ आपल्या मनावरील भार कमी करेल, व्यापार्‍यांची जुनी येणी वसूल होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 07:43 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. जोडीदारासह एकत्र वेळ घालवाल आणि प्रेमसुखाचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ तसेच प्रवासाची शक्यता. उग्र विचार आणि अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. वाहनसुख चांगले मिळेल. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभफलदायी जाईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. अर्थ विषयक लाभाची शक्यता. कार्यालयीन कामे पूर्ण कराल. आणखी वाचा

मिथुन - आज शरीर आणि मन बेचैन राहील असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामात खर्च करावा लागेल. पचनसंस्येचे विकार बळावतील. कामुकता वाढेल. यात्रा- प्रवासासाठी काळ अनुकूल नाही. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आपला आजचा दिवस अशुभ आहे. आज आनंद आणि उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद व तणाव राहील. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. जेवण वेळेवर मिळणार नाही. झोपही शांत मिळणार नाही. आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेश सांगतात की आपल्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज आरोग्य चांगले राहील. भाऊबंदाबरोबर आनंदात वेळ जाईल. त्यांच्याकडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. कार्य यशस्वी झाल्याने मित्र आनंदी होतील. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस आपल्याला शुभफल देईल. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासोबत सुखात दिवस जाईल. आर्थिक लाभ होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील. प्रवासाचे बेत ठरतील. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल पण वाद टाळा. आणखी वाचा

तूळ - श्रीगणेश सांगतात आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक आणि कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या. सृजनात्मक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. प्रिय व्यक्तींबरोबर दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

वृश्चिक - दुर्घटनेपासून सावध राहण्याचा, शस्त्रकियेचा निर्णय न घेण्याचा आणि वादात न पडण्याचा इशारा श्रीगणेश देतात. बोलण्यात कोणाचा अपसमज होऊ नये याकडे लक्ष द्या. शारीरिक कष्ट आणि मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल असे गणेश सांगतात. गृहस्थ जीवनाचा पूर्णतः आनंद घ्याल. मित्रांसमवेत रम्य ठिकाणी प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नात वाढीचे योग आहेत. आणखी वाचा

मकर - आज व्यापारविषयक कामात आपणाला लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इ. साठी दिवस चांगला आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. पण अग्नी, पाणी, अचानक आपत्ती यापासून सावध राहा. व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी राहील त्यामुळे काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी पण आपणाला खुपेल. हर्षोल्हासासाठी पैसा खर्च होईल. प्रवास घडू शकतील. आणखी वाचा

मीन - ईश्वरभक्ती आणी आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष देवून दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च करावा लागेल. घरातील सर्वांशी संयमाने वागा. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष