शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

आजचे राशीभविष्य - 19 फेब्रुवारी 2022; अचानक धनलाभाचे योग, नोकरीत प्रगती, व्यवसायात भरभराट होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 07:46 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

 मेष - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे टाळणे योग्य ठरेल. काहींना कामानिमित्त प्रवास घडून येतील. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. सरकारी कामे मार्गी लागतील. वरिष्ठांची मर्जी राहील.

वृषभ - काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रसिद्धी मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. तब्येतीकडे लक्ष द्या. काहींना प्रवास करावा लागेल. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. मोहात पडून नुकसान करून घेऊ नका. नोकरीत प्रगती होईल. 

मिथुन - जीवनसाथी चांगली साथ देईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील . काहींना नवीन संधी मिळेल. बदलीची शक्यता आहे. मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या संगतीकडे नीट लक्ष द्या. घरी पाव्हण्या-रावळ्यांचा राबता राहील. 

कर्क - व्यवसाय-धंद्यात बरकत राहील. मात्र, मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. भावंडांच्या भेटीगाठी होतील. काहींना कामानिमित्त प्रवास घडून येतील. आरोग्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. घरातील सदस्यांच्या शिस्तीकडे लक्ष द्या. 

सिंह - आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. मुलांच्या मनातील विचार समजून घ्या. त्यांना शिस्त लावा. जमीन जुमल्याच्या व्यवहारात फायदा होईल. 

कन्या - मन प्रसन्न राहील. अडचणी दूर होतील. कामात उत्साह राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीच्या मर्जीनुसार वागणे इष्ट ठरेल. घरात एखादा कार्यक्रम आयोजित केला जाईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. वाहन जपून चालवा. 

तूळ - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. भावंडांच्या सुख-दुःखात सहभागी व्हाल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. व्यवसायात विक्री चांगली होईल. प्रवासाचे योग येतील. प्रवासात अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांची प्रगती होईल. 

वृश्चिक - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. पैशाचा ओघ चांगला राहील. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. घरी पाहुणे येतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल वारसा हक्काने अपेक्षित असलेले लाभ पदरात पडतील. 

धनू - नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. घरी पाव्हण्यारावळ्यांची लगबग राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. क्रोधावर थोडे नियंत्रण ठेवलेले बरे. मनासारखे भोजन मिळेल. नातेवाइकांशी वितंडवाद टाळा. व्यवसायात भरभराट होईल.

मकर - भाग्याची चांगली साथ राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. हाती आलेले पैसे हातोहात खर्च होणार नाहीत याची काळजी घ्या. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. काहींना प्रवास करावा लागेल. 

कुंभ - आर्थिक आवक चांगली राहील. अचानक धनलाभ होईल. विविध प्रकारचे लाभ होतील, मालमत्तेची कामे मार्गी लागतील. प्रवास शक्यतो टाळा. आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयम सोडू नका. 

मीन - अडचणींचे निराकरण होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. गृहसौख्य चांगले राहील. विविध प्रकारचे फायदे होतील. लोकांचे सहकार्य मिळेल.

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष