शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2022; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, नोकरीत प्रगती होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 08:27 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - घरी धामधूम राहील. पाहुणे रावळे यांचा राबता राहील. महिलांना घरातील कामांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. नोकरीत तणाव राहील. कामाच्या निमित्ताने फिरणे होईल. काहींना नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील. फसव्या योजनांपासून सावध राहा. 

वृषभ - व्यवसायात चांगल्या संधी चालून येतील. नवीन व्यवसायासाठी चांगला काळ आहे. विक्री चांगली होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील, जवळचे प्रवास होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन - आर्थिक आवक चांगली राहील. घर, शेती खरेदीचे मनसुबे रचले जात असतील तर त्यांना मूर्त स्वरूप येईल. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. प्रेमप्रकरणे फलद्रुप होतील. काहींना मित्रांसह सहलीला जाता येईल. एखाद्या सौद्यात फायदा होईल. 

कर्क - अनुकूल परिस्थिती राहील. मन प्रसन्न राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. त्यामुळे काही अडचणी आल्या तरी आपण त्यातून मार्ग काढाल. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. जीवनसाथीचे प्रेम मिळेल.सिंह - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास कार्य साधक ठरतील. मुलांना चांगल्या संधी चालून येतील. मुलांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. तब्येतीकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे.

कन्या - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. कामे पटापट मार्गी लागतील. काहींना लाभ होतील. घरात खेळीमेळीचे चातावरण राहील. मनासारखे भोजन मिळेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. त्यामुळे घराची शोभा वाढेल आणि राहणीमानाचा दर्जा उंचावेल.

तूळ - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील, नोकरीत प्रगती होईल. काहींना नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. महत्त्वाच्या प्रकल्पात तुमच्यासाठी खास जबाबदारी राहील. घरी उत्सवी वातावरण राहील. भावंडांच्या भेटी होतील. मुलांशी संवाद साधा. 

वृश्चिक - भाग्याचे पाठबळ मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. खाण्या पिण्याची चंगळ राहील.

धनू - जीवनसाथी तुमची काळजी घेईल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे.  वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. बोलण्यातून कुणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. अचानक धनलाभ होऊ शकतो. 

मकर - महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. अडचणी दूर होतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. कुणाचा सल्ला ऐकायचा आणि कुणाचा सल्ला ऐकायचा नाही ते तारतम्याने ठरवा. खर्चाचे नियोजन नीट करा. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मनासारखे भोजन मिळेल.

कुंभ - महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रगती होईल काही सोयी-सुविधा वाढवून मिळतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. काहींना भेटवस्तू मिळतील. 

मीन - मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. प्रसिद्धी, नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. योग्य सल्ला मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष