शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १२ ऑगस्ट २०२१, आर्थिक लाभ आणि समाजात आदर- सत्कार मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 07:47 IST

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी

मेष - आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र आणि कुटुंबीयां समवेत दिवस आनंदात घालवाल. जास्त लोकांच्या संपर्कात याल.  आणखी वाचा 

वृषभ -  विचारांचा मोठेपणा आणि वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करील. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वादविवाद यात यशस्वी व्हाल. वाचन- लेखनात रस घ्याल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. आणखी वाचा 

मिथुन -   श्रीगणेशांच्या मते महत्त्वाचा निर्णय घेण्यात तुम्ही द्विधा राहाल. आई आणि स्त्रियांच्या बाबतीत संवेदनशील बनाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने तब्बेत बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा. आणखी वाचा 

कर्क -  कामात यश आणि नव्या कामाचा प्रारंभ यासाठी चांगला दिवस. मित्र आणि स्वकीयांशी भेट आपणाला आनंद देईल.  भावंडांशी सलोखा राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल. आर्थिक लाभ आणि समाजात आदर- सत्कार मिळेल.  आणखी वाचा 

 सिंह - दूरस्थ स्नेही आणि नातलग यांच्याशी पत्रव्यवहार लाभ देईल. कुटुंबात सुख शांती मिळेल. उत्तम भोजन मिळेल. आपले वाक्चातुर्य इतरांची मने जिंकेल. निर्धारित कामात यश मिळेल.  आणखी वाचा    

कन्या -  वैचारिक समृद्धी आणि मोहक वाणी यामुळे लाभ होईल आणि सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक दिवस. तब्बेत चांगली राहील आणि मनही प्रसन्न राहील. आणखी वाचा    

तूळ - आपले बोलणे आणि व्यवहार यांवर संयम ठेवा. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. आणखी वाचा 

वृश्चिक -  श्रीगणेश कृपा आपल्या गृहस्थी जीवनात सुख- शांती निर्माण करील. पत्नी आणि मुला कडून शुभवार्ता मिळतील. मंगलकार्ये होतील. विवाहयोग येतील. नोकरी धंद्यात संधी मिळून उत्पन्न वाढेल. आणखी वाचा 

धनु - आज आर्थिक व व्यावसायिक नियोजन करण्यास दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कामे व्यवस्थित पूर्ण होतील. परोपकाराची भावना आज प्रबळ राहील. दिवस आनंदात जाईल.  आणखी वाचा   

मकर -  श्रीगणेशांच्या मते आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. व्यवसाय बौद्धिक कार्यांत नवी विचारधारा अमंलात आणाल. लेखन व साहित्य यात सृजनात्मकता प्रकट होईल. मनाच्या एखाद्या कोपर्‍यात मात्र अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा 

कुंभ -   नकारात्मक विचारांनी मनात निराशा निर्माण होईल. मानसिक उद्वेग आणि रागाची भावना वाढेल. खर्च वाढेल. वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबात मतभेद व भांडण होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

मीन -  श्रीगणेश कृपेने आजचा आपला दिवस सुख- शांतीत जाईल. व्यापारी वर्गाला भागीदारीसाठी उत्तम काळ. पत्नी- पती यांच्यात दांपत्यजीवनात जवळीक वाढेल. मित्र, स्वकीय यांच्याशी भेट होईल. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य