शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - ३ मार्च २०२२;  व्यवसायात भरभराट होईल, अनपेक्षित फायदेही होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 07:33 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. काही कामे प्रगतीपथावर राहतील. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. इतरांना अनाहूत सल्ले देऊ नका. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. आपल्या भावी योजना लोकांना सांगू नका.

वृषभ – चांगल्या संधी चालून येतील. नोकरीत नेहमीपेक्षा जास्त परिक्षम करावे लागतील. आर्थिक आवक चांगली राहील. कामात उत्साह राहील. जीवनसाथीच मोलाची साथ देईल. नातेवाईक, जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. 

मिथुन – काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. बाजारपेठेचे तुमचे अंदाज बरोबर ठरतील. महत्त्वाचे निरोप येतील. आरोग्य चांगले राहील. कामात उत्साह राहील. ज्यांना जवळचे समजता असे लोक पाठ फिरताच तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. 

कर्क – जीवनसाथीची प्रगती होईल. मनातील काळजी दूर होईल. प्रेमात असाल तर घरी सांगण्यास हरकत नाही. काहींना भेटवस्तू मिळतील. मित्र मैत्रिणींच्या सहवासात मौजमजा करण्यात वेळ जाईल. गृहसौख्य चांगले राहील. आळस झटकून कामे करणे आवश्यक आहे.

सिंह – जवळच्या लोकांशी गैरसमज होतील. आपणच पुढाकार घेऊन संवाद साधल्यास समस्या दूर होतील. कुणाला अपमान होईल असे बोलू नका. वेळेचा सदुपयोग केला तर प्रगती कराल. कामात उत्साह राहील. जवळचा प्रवास घडून येईल.

कन्या – धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. थोडे सबुरीने वागण्याची गकज आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अट्टहास करू नका. मानसन्मान मिळेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल.तूळ – नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले जाईल. त्यामुळे कामाचा ताण जाणवणार नाही. भावंडांशी गैरसमज होतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक आवक सामान्य राहील.

वृश्चिक – नोकरीत कामाचा ताण कमी होईल. एखाद्या सौद्यात फायदा होईल. आवडत्या व्यक्तीसाठी जास्त वेळ द्याल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. इतरांच्या भानगडीत पडू नका. मालमत्तेच्या कामात फायदे होतील. 

धनू – जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. त्यामुळे आनंद होईल. जीवनसाथीला नाराज करू नका. वेळ वाया घालवू नका. कामाची यादी बनवून एक एक काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करा. आर्थिक व्यवहार जपून करा.

मकर – जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. गृहसौख्य चांगले राहील. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. गोपनीय माहिती कुणाला सांगू नका. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल.

कुंभ – व्यवसायात भरभराट होईल. अनपेक्षित फायदे होतील. हाती घेतलेले काम पूर्ण कराल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. खाण्यापिण्याचे पथ्य पाळले पाहिजे. आपले कोण परके कोण हे ओळखा.

मीन – आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अधिकारी वर्ग तुमच्याकडे अपेक्षेने पाहील. हितशत्रूपासून सावध राहा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष