शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, हाती पैसा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 07:50 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या

मेष -  कामात व्यस्त राहाल. नोकरीत थोडे तणावाचे वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. थोडी दगदग होईल. आरोग्याची काळजी घ्या. आराम करणे आवश्यक आहे. आर्थिक आवक चांगली राहील. 

वृषभ -  जवळचे प्रवास करावे लागतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. सतत कार्यरत राहाल. मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. एखाद्या वेळेच बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. आर्थिक आवक चांगली राहील. 

मिथुन - नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. आपले वर्चस्व राहील. गृहसौख्य चांगले राहील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. हाती पैसा येईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हाल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.  कर्क -  मनात आनंदी विचार राहतील. थोडा तणाव जाणवेल. पण आपल्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे अडचणी दूर होतील. नोकरीत तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. तुमचे बोलणे ऐकून घेतले जाईल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. 

सिंह - लोकांच्या भेटीगाठी होतील. मनात अस्वस्थता राहील. मात्र लोकांशी बोलून मन मोकळे होईल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. धर्म, कर्म याकडे ओढा राहील प्रेमात जपून पावले टाकणे इष्ट ठरेल. संयमाने वागणे आवश्यक आहे. 

कन्या -    विविध प्रकारचे लाभ होतील. ग्रहमानाची चांगली साथ राहील. आर्थिक आवक चांगली राहील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. प्रवास कार्यसाधक ठरतील. मनात सकारात्मक विचार राहतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

 तूळ -  नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. थोडा कामाचा ताण राहील. भाग्याचे पाठबळ मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरी पाहुणे येतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. 

वृश्चिक - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडलेली कामे मार्गी लागतील. घरात आनंदी वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. भाग्याची चांगली साथ राहील. काहींना प्रवास घडून येतील. 

धनू - व्यवसायात विक्री चांगली राहील. नवीन प्रयोग करून पाहिले जाऊ शकतात. आर्थिक उलाढाली जपून करा. कुणी तुम्हाला मोहात पाडू शकेल. मात्र सदसद्विवेक बुद्धी जागरुक राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळा. 

मकर -  धनलक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. जमीनजुमल्याच्या व्यवहारात यश मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. 

कुंभ -  दगदग धावपळ होईल. कामाचा ताण राहील. भावंडांशी गैरसमज होतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. महत्त्वाच्या कामात दगदग होईल. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या रामरगाड्यातून स्वत:च्या आरामासाठी वेळ काढा.

मीन -   मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीत कामाचा ताण राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. जीवनसाथीशी गैरसमज करून घेऊ नका. जीवनसाथीचा सल्ला ऐकणे हिताचे राहील. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य