शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 7 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 07:23 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

 

आजचा दिवस मिश्र फलदायी राहील. अस्वास्थ्य आणि कटकटीचा अनुभव येईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आज संताप वाटेल आणि त्यामुळे कामे बिघडतील. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करा... आणखी वाचा

वृषभ 

आजचा दिवस काळजीपूर्वक राहा अशी सूचना. नवीन कार्याचा आरंभ करू नका. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. शारीरिक थकवा आणि मानसिक व्यथा अनुभवाल. शक्य असेल तर अध्यात्मासाठी वेळ काढा... आणखी वाचा

मिथुन

दिवस आनंदात आणि भोग विलासात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी भेट होईल. मित्र आणि प्रिय व्यक्तींसमवेत मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल व परिधान करण्याची संधी मिळेल. प्रणयासाठी उत्तम दिवस... आणखी वाचा

कर्क

आज दिवस चांगला जाईल. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखद प्रसंग घडेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. तब्बेत चांगली राहील. कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ जाईल. नोकरदारांना नोकरीत लाभ होतील... आणखी वाचा

सिंह 

आजचा दिवस आनंदात जाईल. अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट फलस्वरूप होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील. संततीच्या दृष्टीने प्रगतीच्या वार्ता मिळतील... आणखी वाचा

कन्या 

आजचा दिवस आपणाला चांगला नाही. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. घर, जमीन इ. कागदपत्रे जपून ठेवा... आणखी वाचा

तूळ

आजचा दिवस शुभ फलप्राप्तीचा आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घरविषयक प्रश्नांची चर्चा होईल. एखाद्या छोटया धार्मिक ठिकाणी जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल. परदेशातून चांगल्या वार्ता मिळतील... आणखी वाचा

वृश्चिक

आजचा दिवस साधारणच आहे. नाहक खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज दूर करा. शारीरिक त्रास आणि मनात मरगळ राहील... आणखी वाचा

धनु

मानसिक स्वास्थ्य याकडे लक्ष द्या. ठरलेली कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास, तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे. नातेवाईकाकडे एखाद्या मंगल कार्यासाठी उपस्थीत राहाल. स्वकीयांना भेटून आनंद मिळेल... आणखी वाचा

मकर

कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्च वाढेल. धार्मिक व सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल व त्यात खर्चही होऊ शकतो. आरोग्याविषयी चिंता राहील. मुलगा आणि नातेवाईक यांच्याशी पटणार नाही... आणखी वाचा

कुंभ 

नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी धंद्यात फायदा होऊ शकतो. स्त्रीयांकडून कामे होऊ शकतात. आज आपल्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी आहे. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संतती बरोबर चांगले जमेल... आणखी वाचा

मीन

आज आपला दिवस शुभफल देणारा जाईल. कामे यशस्वी होतील आणि वरिष्ठ अधिकारी संतुष्ट असतील त्यामुळे आनंदी दिवस जाईल. व्यापार्‍यांच्या व्यापारात वाढ होईल. वडील आणि वाडवडील यांच्याकडून फायदा होईल. लक्ष्मीची कृपा राहील... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष