शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 4 जानेवारी 2022 - धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल अन् भाग्याची उत्तम साथ राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 07:42 IST

Today's horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १४, १९४३. तिथी : पौष शुक्ल द्वितीया. (सायंकाळी ५.१९ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४३, प्लव नाम सवस्तर, नक्षत्र : सकाळी १०.५७ पर्यंत उत्तराषाढा, त्यानंतर श्रवण. रास : मकर. आज : चांगला दिवस. राहू काळ : दुपारी ३ ते ४.३०. 

मेष - नोकरीत थोडे बदल होऊ शकतात. कामाचा व्याप वाढेल. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. घरी लोकांची ये-जा चालू राहील. मित्र, जवळचे नातेवाईक भेटतील. भाग्याचे पाठबळ मिळेल. प्रवास सुखकर होतील. जोडीदाराची चांगली प्रगती होईल. 

वृषभ - भाग्याची उत्तम साथ राहील. महत्त्वाच्या कामात सर्वांचे सहकार्य मिळेल. कामे मार्गी लागतील. क्रोधाला आवर घातला पाहिजे. जोडीदाराशी वाद घालू नका. काहींना प्रवास करावा लागेल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. नोकरीत हितशत्रंपासून सावध राहा.

तूळ - धनलाभाच्या संधी मिळतील. व्यवसायात भरभराट होईल. स्पर्धकांना मागे टाकाल. जमिनिच्या व्यवहारात फायदा होईल. घरी आल्या गेल्याचा आदळ राहील. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामात बदल होऊ शकतात. 

वृश्चिक - ग्रहमान अनुकूल आहे. छोट्या गोष्टींवरून भांडण उकरून काढू नका. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येतील. व्यवसायात अंदाज चुकू शकतात. घरात वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहीत.

मिथुन - जीवनसाथीची चांगली साथ राहील. भागीदारी व्यवसायात प्रगती होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. दगदगीची कामे टाळा. अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. कागदपत्रे सांभाळा. थोडी गोपनीयता बाळगा.

कर्क - ग्रहमानाची अनुकूलता राहील. कामात अडचणी दूर होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे कामे पुढे सरकतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात विक्री चांगली होईल. मुलांशी संवाद साधा.

धनू- जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. मात्र वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. भेटवस्तू मिळतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. धनलाभ होईल. खाण्यापिण्याची लयलूट राहील. व्यवसायात सावधपणे व्यवहार करा. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. 

मकर - सरकारी कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. शेती, घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल.

सिंह - महत्त्वाच्या कामात दिरंगाई होईल. थोडा संयम ठेवलेला बरा. आरोग्याला जपा. मुलांना घवघवीत यश मिळेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील. जोडीदाराची काळजी घ्या. नोकरीत वाद होऊ शकतात. कामाचे नियोजन नीट करा.

कन्या- घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घरातील सदस्यांशी समन्वय राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामात ताण कमी होईल. तुमच्या बोलण्यामुळे फायदा होईल. जोडीदाराची काळजी घ्या.

कुंभ - नोकरीत वादापासून दूर राहा. तुमचे वर्चस्व साहील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. भेटवस्तू मिळतील. सुखसोयी मिळतील. महत्त्वाच्या कामात दिरंगाई होईल. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. मात्र संयम सोडू नका. 

मीन - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य मिळेल. नोकरीत बधतीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. सहजासहजी यश मिळेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मुलांना अपेक्षित यश मिळेल.

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष