शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

आजचं राशीभविष्य- ३१ ऑक्टोबर २०२१; घरात सुख शांती नांदेल; प्रतिस्पर्ध्यांना चीतपट कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 07:26 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास...

मेष - स्वभावातील तापटपणा आणि हट्टी वागण्यावर नियंत्रण ठेवा असा सल्ला श्रीगणेश देतात. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक कमजोरी जाणवेल. यात्रा- प्रवास यासाठी काळ योग्य नाही. आणखी वाचा 

वृषभ - आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वास यांची महत्त्वाची भूमिका राहील. वडील घराण्याकडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश आणि फायदा मिळेल. आणखी वाचा मिथुन - दिवसाच्या प्रारंभी उत्साह आणि स्फूर्ती जाणवेल. भाग्योदयाच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार तुम्हाला अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. मित्र, नातेवाईक आणि शेजारी- पाजारी यांच्याशी सलोख्याचे संबंध राहतील. आणखी वाचा 

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणामुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल. आणखी वाचा सिंह - आत्मविश्वास आणि झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. उक्ती आणि कृतीत उग्रपणा आणि कोणाशी अहंपणाने संघर्ष होण्याची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आणखी वाचा कन्या - शारीरिक आणि मानसिक चिंता बेचैन करतील असे श्रीगणेश सांगतात. एखाद्याशी तंटाबखेडा होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्यजीवनात खटका उडेल. आणखी वाचा तूळ - गृहस्थी जीवनात सुख आणि आनंद मिळेल. उत्पन्न वाढीचा योग आहे. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याचे संकेत आहेत. परिवारातील व्यक्ती आणि मित्रांच्या सहवासात खुश राहाल. आणखी वाचा वृश्चिक - श्रीगणेशाच्या कृपेने आपली सर्व कामे यशस्वी पूर्ण होताना अनुभवाल. संसारात आनंदात आणि समाधानात राहील. समाजात मान- प्रतिष्ठा मिळेल. तब्बेत चांगली राहील. वरिष्ठ अधिकारी आणि वडीलधारे यांची मर्जी राहील. आणखी वाचा धनु - आज कोणतीही धोकेदायक चाल आपणाला अडचणीत टाकेल. कोणतेही काम करण्यात जोश- उत्साह वाटणार नाही. शारीरिक आणि मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. नोकरीधंद्यात त्रास जाणवेल. आणखी वाचा मकर - नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या असा सल्ला श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांबरोबर अंतर्गत मतभेद वाढतील. क्रोध- आवेशावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा कुंभ - प्रणय, रोमान्स, प्रवास, पर्यटन, मनोरंजन आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसमवेत भोजनानिमित्त जाण्याचा योग येईल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्तीचे योग आहेत. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. आणखी वाचामीन - दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. उक्ती आणि कृती यात सांभाळून काम करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. प्रतिस्पर्ध्यांना चित कराल. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष