शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - ३० मार्च २०२२: नोकरीत अडचणींना तोंड द्यावे लागले; संयमाची परिक्षा पाहिली जाईल, प्रवास कार्य साधक ठरतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 08:00 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- व्यवसायात बरकत राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. आत्मविश्वासाने कामे कराल. आर्थिक आवाक चांगली राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. 

वृषभ- विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल. योग्य मार्गदर्शन मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. जीवनसाथीशी सूर जूळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल.

मिथुन- घरात चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. मनात सकारात्मक विचार राहतील. मित्र, नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. बोलण्यावर संयम ठेवा. 

कर्क- वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. घरातील सदस्यांसाठी वेळ काढा. जीवनसाथी आणि मुलांकडे लक्ष द्या, नोकरीत अडचणींना तोंड द्यावे लागले. संयमाने वागणे आवश्यक आहे. 

सिंह- नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. संयमाची परिक्षा पाहिली जाईल. मधुर संभाषण करा. कुणाला दुखवू नका. कुणाला उसने पैसे देताना विचार करुन घ्या. कुठे सही करायची असेल तर कागदपत्रे वाचूनच सही करा. 

कन्या- धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्र, मैत्रिणी यांच्या सहवासात याल. करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घ्याल. 

तूळ- आर्थिक आवाक चांगली राहील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. महत्वाचे काम मार्गी लागेल. व्यवसायात भरभराट होईल. मालाची विक्री चांगली राहील. नवीन संधी दिसतील. मुलांना यश मिळेल. 

वृश्चिक- महत्वाच्या कामासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल. मदत मिळेल. काम मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय राहील. पाहुणे येतील. प्रसिद्धि मानसन्मान मिळेल. नवीन संधी मिळेल. 

धनू- वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. महत्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा व्यवस्थित आढावा घ्या. काम झाले पाहिजे, असा अट्टहास करु नका. अन्यथा वेळ आणि पैसा जास्त खर्च होईल. व्यवसायात चांगली स्थिती राहील.

मकर- तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. व्यवसायात बरकत मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. महत्वाच्या कामात यश मिळेल. प्रवास कार्य साधक ठरतील. 

कुंभ-  धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. जवळचे नातेवाईक भेटतील. त्यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात यश मिळेल. कामाचा ताण जाणवणार नाही. 

मीन- व्यवसायात विक्री चांगली राहील. नफ्याचे प्रमाण वाढेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु राहील. मनात आनंदी विचार राहतील. आपले महत्व लोकांना पटेल. - विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष