शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य- २९ मार्च २०२२: निष्कारण धाडस नको; काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 07:27 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- अतिशय सुंदर ग्रहमान. विविध प्रकारचा लाभ होईल. आर्थिक ओघ सुरू राहील. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील. कामे मार्गी लागतील. बरेच दिवसांपासून वाट पाहत असलेली सुसंधी मिळेल. गृहसौख्य चांगले राहील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील.

वृषभ- नोकरीत प्रगतीच्या दिशेनं वाटचाल सुरू राहील. भाग्याची साथ राहील. मोठी संधी चालून येईल. योग्य मार्गदर्शन मिळेल. वाहन किंवा महागडी वस्तू खरेदी करण्याचा योग येईल. घरी पाहुणे येतील. प्रवास कार्य साधक ठरतील. जीवनसाथी साथ देईल.

मिथुन- भाग्याची उत्तम साथ राहील. पर्यटन, धार्मिक कार्य यानिमित्तानं प्रवास होतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अधिकार वाढवून मिळतील. तुमच्या बोलण्याचा फायदा होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

कर्क- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडं संयमानं वागणं आवश्यक आहे. वाहनं जपून चालवा. निष्कारण धाडस करू नका. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र फसव्या योजनांपासून सावध राहा. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.

सिंह- अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. त्याचा फायदा होईल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. प्रेमात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कामात व्यस्त राहाल.

कन्या- जीवनसाथीचा सल्ला घ्यावा. गैरसमज करून घेऊ नका. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. त्यांच्या प्रगतीचा आढावा घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळलेला बरा. पोटाची काळजी घ्या.

तूळ- घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. एखादी महागडी वस्तू खरेदी कराल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अनेकांचं सहकार्य मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. त्यामुळे आनंद होईल. काहींना प्रवास करावा लागेल. लोकांना नाराज करू नका.

वृश्चिक- घरात उत्सवी वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घरी लोकांची ये-जा राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामाचं स्वरुप बदलेल. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. त्यात यश मिळेल. मुलांना अभ्यास, परीक्षेत यश मिळेल.

धनू- जवळचे नातेवाईक भेटतील. काही रुसवे फुगवे राहतील. प्रवासकार्य साधक ठरतील. व्यवसायात बरकत राहील. आर्थिक आवक राहील. मनासारखे पदार्थ ताटात दिसतील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. घरात सदस्यांचा एकमेकांशी समन्वय राहील.

मकर- धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. जमीन, घर खरेदीच्या व्यवहारात फायदा होईल. मात्र कागदपत्रे एकदा नजरेखालून घाला. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनासाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात यश मिळेल.

कुंभ- मन प्रसन्न राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कामाचा ताण राहील. मात्र, नियोजनबद्ध पद्धतीनं काम केल्यास ताण जाणवणार नाही. जोडीदार चांगली साथ देईल. प्रेम वृद्धिंगत होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन- आर्थिक लाभाचे प्रमाण वाढते राहील. अचानक धनलाभ होईल. रेंगाळत पडलेलं काम झाल्याचा सुखद अनुभव येईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. काहींना तीर्थयात्रा घडतील. दूरचा प्रवास होईल. जोडीदार चांगली साथ देईल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष