शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य- २९ जानेवारी २०२२: नोकरीत अनुकूल घटना घडतील; अचानक मोठी संधी चालून येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 07:27 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...   

मेष- भाग्याची चांगली साथ राहील. ग्रहमान अनुकूल आहे. अचानक धनलाभ होईल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. नोकरीत प्रगती होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील.

वृषभ- अचानक धनलाभ होईल. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. एखादी व्यक्ती गोड बोलून तुम्हाला अ़डचणीत आणणार नाही याची दक्षता घ्या. सांभाळून राहा. महत्त्वाचे काम पुढे ढकला. जोडीदाराची काळजी घ्या. मुलांना यश मिळेल.

मिथुन- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. दूरच्या प्रवासाचा योग. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. मुलाच्या संगतीकडे लक्ष द्या. नोकरीत वादापासून दूर राहा.

कर्क- मनाविरुद्ध घटना घडतील. जीवनसाथीचे पाठबळ मिळेल. त्या जोरावर अडचणीतून मार्ग निघेल. तब्येतीची काळजी घ्या. आराम करणे गरजेचे आहे. प्रवास शक्यतो टाळा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. मुलांकडे लक्ष द्या.

सिंह- भाग्याची चांगली साथ मिळेल. जवळचा प्रवास करावा लागेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. मात्र फार काळजीचे कारण नाही. आराम करावा लागेल.

कन्या- घरी पाव्हण्या रावळ्यांचा राबता राहील. मनासारखे भोजन मिळेल. महिलांना घरातील कामात जास्त वेळ द्यावा लागेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. हाती मनासारखा पैसा येईल. मुलांना यश मिळेल.

तूळ- कामानिमित्त जवळचा प्रवास होईल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमचे वर्चस्व राहील. मात्र वादापासून दूर राहा. भावंडांची भेट होईल. जीवनासाथी चांगली साथ देईल. 

वृश्चिक- धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. मालमत्तेच्या कामात फायदे होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. भावंडांशी सख्य राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

धनु- विवाहोत्सुकांचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली वेग धरतील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. कामकाजातील अडचणी दूर होतील. मन प्रसन्न राहील. मालमत्तेची कामे होतील.

मकर- चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. महागड्या वस्तू खरेदी कराल. दूरचा प्रवास होईल. प्रवासांत पैशांची उधळपट्टी कराल. मित्र-मैत्रिणींच्या संगतीत वाहवत जाऊ नका. एखाद्या वेळी अडचणीत याल. महत्त्वाचे काम पुढे ढकला. जीवनसाथीला नाराज करू नका.

कुंभ- धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. अचानक फायदा होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. भेटवस्तू मिळतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. एक पाऊल पुढे पडेल. गृहसौख्य चांगले राहील.

मीन- नोकरीत अनुकूल घटना घडतील. महत्त्वाच्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. काहींची बदली होऊ शकते. अचानक मोठी संधी चालून येईल. क्रोधाला आवर घाला. सरकारी कामे मार्गी लागतील. घरी पाहुणे येतील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष