शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

राशीभविष्य - २८ जानेवारी २०२२: धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ; हाती मनासारखा पैसा येईल, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 07:26 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...   

मेष- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मात्र कामाच्या निमित्ताने दगदग करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. 

वृषभ- आर्थिक आवक चांगली राहील. विविध कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी वादविवाद घालू नका. प्रत्येकवेळी आपलीच बाजू खरी असते असे नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आराम करणे आवश्यक आहे. नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद होतील.

मिथुन- काहींना कामानिमित्त प्रवास घडून येतील. प्रवासात काळजी घ्या. जीवनसाथी चांगली साथ देईल. घरात किरकोळ कारणावरून गैरसमज होतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य ठरेल.  

कर्क- तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार घेणे, पथ्य पाळणे आणि आराम करणे आवश्यक आहे. प्रवास शक्यतो टाळा. जीवनसाथीचे म्हणणे ऐकण्यातच हित राहील. मुलांच्या मनातील मायना समजून घ्या. नोकरीत ठिकठाक परिस्थिती राहील. 

सिंह- कामाचा ताण राहील. मात्र थोडे प्राधान्यक्रम ठरवून कामे करत राहिल्यास कामे आटोक्यात येतील. आरोग्याची काळजी घ्या. आराम करणे आवश्यक आहे. मुलांशी संवाद साधा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

कन्या- व्यवसायात विक्री चांगली होईल. आर्थिक गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. जोडीदार आपल्याला चांगली साथ देईल. प्रवासात दगदग, धावपळ होईल. नोकरीत मतभेदाचे प्रसंग येतील. थोडी संयमाने परिस्थिती हाताळली पाहिजे.  

तूळ- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली जाईल. मनासारख्या घटना घडतील. आरोग्याची काळजी घ्या. आहाराचे तंत्र सांभाळा. आर्थिक आवक चांगली राहील. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. भेटीगाठी होतील.

वृश्चिक- महत्त्वाचे काम पूर्ण होईल. जमिनीच्या खरेदीसाठी प्रस्ताव समोर येतील. पैशाचा ओघ चांगला राहील. व्यवसायात विक्री चांगली होईल. जोडीदाराच्या विचाराचा आदर करा. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. गुप्तशत्रूंचा फारसा विचार करू नका. 

धनु- नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. प्रवासाचे नियोजन नीट करा. ऐनवेळी काही गोष्टींत बदल कराल. तर धावपळ करावी लागेल. आपल्या जवळचे कोण आणि परके कोण, हे ओळखा. त्यानुसार व्यवहार करा. 

मकर- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. हाती मनासारखा पैसा येईल आणि तेवढ्याच प्रमाणात खर्चदेखील कराल. महागड्या वस्तू खरेदी कराल. प्रवास कार्य साधक ठरतील. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. उसने पैसे देताना विचार करून द्या. 

कुंभ- धावपळ दगदगीचा दिवस राहील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. आर्थिक आवक चांगली राहील. योग्य सल्ला मिळेल. अनपेक्षित लाभ होतील. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

मीन- विविध मार्गांनी धनलाभ होईल. ग्रहमान अनुकूल राहील. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. तुमच्या शब्दाला किंमत राहील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. कोर्ट-कचेरीच्या कामाला सफलता मिळेल. प्रवासाचे योग येतील. मनावर संयम ठेवा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष