शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

आजचे राशीभविष्य - 27 मे 2021; द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 07:06 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...काय सांगते तुमची राशी.

मेष - श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा आपला दिवस आध्यात्मिक दृष्टीने वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ आणि रहस्यमय विद्या आत्मसात करण्यात गोडी वाटेल. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता आहे. नवीन कामाचा आरंभ करण्यास दिवस चांगला नाही. प्रवासात अचानक संकटे येतील. क्रोध आणि वाणीवर संयम ठेवा.  आणखी वाचा

वृषभ - दांपत्यजीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाल आणि दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसोबत उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रांकडून बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश सांगतात की कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. घरात सुखाचे आणि शांतीचे वातावरण राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. आणखी वाचा

कर्क - अगदी शांत राहून आजचा दिवस घालवा अशी सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उद्भवतील. प्रेमिकांमध्ये वादविवाद होऊन मतभेद होतील. भिन्न लिंगीय व्यक्तीबद्दलचे आकर्षण संकटात टाकेल. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज परिवारात मतभिन्नतेचे वातावरण राहील. कुटुंबाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येतील. त्यामुळे उदासीनता जाणवेल. जमीन, घर, वाहन इ. व्यवहार करताना हस्ताक्षर करण्यास दिवस चांगला नाही. नोकरदारांना पण दिवस चांगला नाही. आणखी वाचा

कन्या - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसमवेत वेळ आनंदात जाईल. त्यांच्याकडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांची चाल हाणून पाडाल. भाग्योदयाचा योग असूनही एखाद्या कामात अविचाराने पाऊल टाकाल त्यामुळे हानी होईल आणखी वाचा

तूळ - आज द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका असे श्रीगणेश सांगतात. नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवा. त्यामुळे कुटुंबीयांशी वादविवाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानने राहावे लागेल. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबात आनंदात दिवस घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. प्रिय व्यक्तींशी भेट सफल आणि आनंददायक ठरेल. एखादी शुभवार्ता मिळेल. स्नेही आणि मित्रवर्ग यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस कष्टप्रद जाईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध आणि आवेश राहील. त्यामुळे कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. तब्बेत बिघडेल. बोलणे आणि वागणे यांवर संयम ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश म्हणतात की आजच्या लाभप्राद दिनी एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस शुभ आहे. शेअर- सट्टा या मध्ये धन लाभ होईल. मित्र आणि संबंधित यांच्याशी भेट झाल्याने आनंद वाटेल. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेशाच्या आशीर्वादा बरोबरच वरिष्ठ अधिकारी आणि वयोवृद्धांची आपणावर कृपादृष्टी राहील. आपली सर्वकामे अगदी सरळपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक दृष्ट्या शांतता लाभेल.  आणखी वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की आज शरीर आणि मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजीत टाकील. नोकरीत उच्च पदाधिकार्‍यांशी वादविवाद होतील आणि त्यांची नाराजी ओढवून घ्याल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. नकारात्मक विचार मनाला घेरून टाकतील. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष