शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 26 मे 2021; जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 06:59 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...काय सांगते तुमची राशी.

मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून अध्यात्माकडे वळाल. गूढ रहस्यमय विद्ये कडे आकर्षण राहील. गाढ चिंतन- मनन आपणाला अलौकिक अनुभूती देईल. वाणीवर संयम ठेवाल तर अनेक गैरसमजातून वाचाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने संसारात आणि दांपत्य जीवनात सुख- शांती अनुभवाल. परिवारातील सदस्य आणि निकटचे मित्र यांच्या समवेत उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळपासच्या प्रवासाचे नियोजन कराल. तब्बेत चांगली राहील. धनलाभ होईल. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश कृपेने आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. तब्बेत चांगली राहील. आर्थिक लाभ होईल. ऑफिस मध्ये संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील. आणखी वाचा

कर्क - दिवसाची सुरूवात चिंता आणि उद्वेगाने होईल. तब्बेतीच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही. अचानक धन खर्च होईल. प्रेमिकां मध्ये वादविवाद होऊन मतभेद किंवा बोलाचाली होईल. कामुकते मुळे मानभंग होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा

सिंह - नकारात्मक विचार निराशा निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आईवडिलांशी मतभेद होतील. त्यांची तब्बेत बिघडेल. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. जलाशयापासून जपा.  आणखी वाचा

कन्या - अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा असे श्रीगणेश सांगतात. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे आणि शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील. प्रेयसीचा सहवास लाभेल. आणखी वाचा

तूळ - आपला हट्टीपणा सोडून समाधानकारक काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. आणखी वाचा

वृश्चिक - तन- मनाने खुश आणि ताजेतवाने राहाल. कुटुंबीय आणि मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, भेट- मुलाखात होईल. जीवन साथीदारा बरोबर गाढ आपलेपणा निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. शुभ कार्यानिमित्त बाहेर जावे लागेल. आणखी वाचा

धनु - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणासाठी कष्टदायक राहील. तब्बेत बिघडेल. परिवारातील व्यक्तींसोबत कटकट झाल्याने मन दुःखी होईल. त्यांमुळे मानसिक दृष्ट्या पण अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा. आणखी वाचा

मकर - नोकरी- व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत आजचा दिवस आपणाला शुभ जाईल असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि आप्तेष्टांसह बाहर जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी आणि मुलगा यांच्याकडून लाभ होईल. विवाहोत्सुक युवक- युवतींची वैवाहिक समस्या सुटेल. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश कृपेने आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण होईल. त्यामुळे आपण खुश राहाल. नोकरी- व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. वडीलधारे आणि वरिष्ठ अधिकारी यांची कृपादृष्टी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त व्हाल.  आणखी वाचा

मीन - नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. तब्बेतीची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी काम करताना सावध राहा. संततीच्या समस्या सतावतील. प्रतिस्पर्ध्यांची चाल यशस्वी होईल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष