आजचे राशीभविष्य - 25 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 07:15 AM2019-10-25T07:15:57+5:302019-10-25T07:16:07+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope - 25 October 2019 | आजचे राशीभविष्य - 25 ऑक्टोबर 2019

आजचे राशीभविष्य - 25 ऑक्टोबर 2019

Next

मेष - आज आपले शरीरस्वास्थ्य चांगले राहील तसेच मनही प्रसन्न असेल. काल्पनिक जगातून सहल करताना नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्याल. आणखी वाचा

वृषभ - आज आपण वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे असे श्रीगणेश सांगतात. जलाशयापासून दूर रहा. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश कृपेने आजचा दिवस सुखा- समाधानात जाईल. भावंडांशी ताळमेळ साधल्याने आपला फायदा होईल. स्वजन व मित्र भेटतील. आणखी वाचा

कर्क - लाभ देण्यासाठी आजचा दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहज पार पडतील. आणखी वाचा

सिंह - आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलपूर्ण राहील असे श्रीगणेश सांगतात. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आणखी वाचा

कन्या - भावनेच्या भरात मन वाहू देऊ नका. गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. कोणाशी उग्र वाद किंवा भांडण टाळा. आणखी वाचा

तूळ - श्रीगणेश सांगतात की आज नवे कार्य हाती घेऊ नका. वैचारिक पातळीवर मन अडकून पडेल आणि मनाची खंबीरता कमी होईल. आणखी वाचा

वृश्चिक- व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल असे श्रीगणेश सांगतात. कामे सहजगत्या पूर्ण होतील. आणखी वाचा

धनु - आज स्वाभावात उग्रपणा आणि तब्बेत कमजोर राहील असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक यात्रा किंवा प्रवासाची शक्यता. व्यवसायात अडथळा किंवा विवाद होण्याची शक्यता. आणखी वाचा

मकर - आजारपणावर खर्च करावा लागेल असे श्रीगणेश सांगतात. अचानक धन खर्चाची शक्यता. घरातील सदस्यांबरोबर खडाजंगी होणार नाही याचे भान ठेवा. आणखी वाचा

कुंभ - आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून काम करा असा सल्ला श्रीगणेश देतात. वैवाहिक जीवनात दुःखद प्रसंग अनुभवाल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेशांच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. आणखी वाचा
 

Web Title: Today's Horoscope - 25 October 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.