शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 16 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 07:20 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

 

आपले एखादे काम किंवा प्रकल्पास सरकारकडून लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण मुद्दया संबंधी उच्च अधिकार्‍यांसमवेत विचार- विनिमय होईल. ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास करावा लागेल... आणखी वाचा

वृषभ 

विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्‍यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. तीर्थ यात्रांना भेटी द्याल. आध्यात्मिक प्रगती होईल... आणखी वाचा

मिथुन 

संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी, शस्त्रक्रिया आज करू नका. मितभाषा राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. तब्बेत बिघडेल. मानसिक दृष्ट्या निराश राहाल... आणखी वाचा

कर्क 

संवेदनशीलता आणि प्रेमाने व्याप्त मन आज भिन्न लिंगीय व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज- मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इ. खरेदी होईल. दांपत्यजीवन चांगले राहील. व्यापार्‍यांना विदेशी व्यापारात चांगला फायदा होईल... आणखी वाचा

सिंह

उदासीनता आणि शाशक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ बनवेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. सहकारी फारसे सहकार्य करणार नाहीत... आणखी वाचा

कन्या

आजचा दिवस चिंता आणि उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे तब्बेत बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च उद्भवतील. बौद्धिक चर्चा आणि समझोता यात असफल व्हाल. प्रिय व्यक्ती भेटतील... आणखी वाचा

तूळ

विचारातील सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज यात्रा- प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन आणि पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल... आणखी वाचा

वृश्चिक

कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग असल्याचे श्रीगणेश सांगतात. भावंडांशी कौटुंबिक चर्चा आणि नियोजन होईल. तन- मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. मित्र, सगे सोयरे यांचे आपणाकडे येणे होईल... आणखी वाचा

धनु

कुटुंबातील व्यक्तींशी होणार्‍या गैरसमजा पासून बचाव करा. नाहक खर्च होईल. मानसिक उलघाल आणि द्विधा स्थिती यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही... आणखी वाचा

मकर

घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरी- व्यवसायात लाभ होईल. तब्बेत चांगली राहील... आणखी वाचा

कुंभ

पैशाची देवाण- घेवाण किंवा जामीनकी आपली फसवणूक करणार नाही याकडे लक्ष द्या. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल. तब्बेती विषयी समस्या उद्भवतील. पैशाची गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्या... आणखी वाचा

मीन

समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारे आणि मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. संतती व पत्नीकडून लाभ होतील... आणखी वाचा

 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष