शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

आजचे राशीभविष्य - ०३ ऑगस्ट २०२१; हट्टीपणा सोडा, घर आणि संपत्ती संबंधित कामे जपून करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 06:58 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...,काय सांगते तुमची राशी...

मेष - आज स्वतःचे खाजगी विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करा असे श्रीगणेश सांगतात. घर आणि घरातील व्यक्तींचे काम करताना समाधानकारक व्यवहार स्वीकारणे योग्य ठरेल. वाणीवर नियंत्रण ठेवा अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतील. वेळेवर जेवणही मिळणार नाही. अधिक वाचा

वृषभ - श्रीगणेश म्हणतात की आज आर्थिक जवाबदारीकडे खास लक्ष द्याल आणि योग्य आर्थिक नियोजनही कराल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. उत्साही मन आणि स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. अधिक वाचा

मिथुन - उक्ती आणि कृती यामुळे काही संकट उभे राहणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आवेश आणि उग्रपणा यांमुळे कोणाशी भांडण होणार नाही याची काळजी घ्या. तब्बेत चांगली राहणार नाही. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. अपघाताचे ग्रहमान आहे. कुटुंबातील व्यक्तींशी भांडण होईल.  अधिक वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभकारी आहे. नोकरी व व्यापारात लाभाचे संकेत आहेत. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. अविवाहितांना विवाहयोग आहेत. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. अधिक वाचा

सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव पडेल असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकार्‍यांवर आपल्या कामाचा सकारात्मक प्रभाव पडून ते आपणावर खूष राहतील. दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. अधिक वाचा

कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेने भरलेला असेल असे श्रीगणेश सांगतात. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव असेल. थकवा आणि अशक्तपणामुळे कामे मंद होतील. नोकरी व व्यवसायात सहकारी व अधिकारी नकारात्मक वागतील. अधिक वाचा

तूळ - कोणाशी वादविवाद किंवा भांडण न करण्याची सूचना श्रीगणेश देतात. रागावू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण हितावह ठरेल. हितशत्रूंपासून सावध राहा. तब्बेतीकडे लक्ष द्या. अचानक धनलाभ होईल. गूढ विद्या आणि रहस्यमय विषय यांचे आकर्षण राहील. अधिक वाचा

वृश्चिक - आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसोबत पिकनिक वा पार्टी यात दिवस चांगला जाईल. वस्त्रालंकार, वाहन व भोजनसुख चांगले मिळेल अधिक वाचा

धनु - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस अनुकूल आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शरीर स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता राहील नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण. सहकार्य मिळेल. अधिक वाचा

मकर - शारीरिकदृष्ट्या आळस, थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. व्यवसायात दैवाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांना तुमचे काम आवडणार नाही. द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील. अधिक वाचा

कुंभ - स्वभावातील हट्टीपणा सोडण्याची सूचना श्रीगणेश देतात. भावूकतेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. सामाजिक प्रतिष्ठा भंग पावणार नाही, याकडे लक्ष द्या. घर आणि संपत्ती संबंधित कामे आज जपून करावीत. आईकडून लाभ होईल.  अधिक वाचा

मीन - महत्त्वाचे निर्णय घ्यायला दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार आणि खंबीर मन यांमुळे कार्य चांगल्या प्रकारे कराल. मित्रांसोबत प्रवास- पर्यटन कराल. भावंडांशी जवळीक वाढेल. अधिक वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष