शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - ४ मार्च २०२२;  'या' राशीच्या मुलांना अनपेक्षित संधी मिळतील, नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 07:32 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – कामाचा ताण वाढेल. दूरचा प्रवास करावा लागेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र थोरामोठ्यांचे सहकार्य, मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे मनात आत्मविश्वास निर्माण होईल. चर्चेतून मार्ग निघेल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल.

वृषभ – अकल्पित लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. महत्त्वाच्या कामाक सहजासहजी यश मिळेल. आत्मविश्वासाने कामे कराल. जीवनसाथी चांगली साथ देईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

मिथुन – नोकरीत अनुकूल बदल होतील. बदलीची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळेल. घरी पाहुणे येतील. मुलांची काळजी घ्या. त्यांना अभ्यासासाठी वातावरण निर्माण करुन द्याल. त्यांचा उत्साह वाढेल असे शब्द वापरा.

कर्क – भाग्याचे पाठबळ मिळेल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. अडचणी दूर होतील. धार्मिक कार्यासाठी प्रवास करावा लागेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. जीवनसाथी तुमच्या मनात असेल तसाच वागेल. कुणाच्या गोड बोलण्याला भुलू नका.

सिंह – महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वाहन जपून चालवा. विश्रांती घेण्यासाठी वेळ द्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. खाण्याचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. अनावश्यक ताण घेऊ नका.

कन्या – जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. मात्र काही गैरसमज होऊ शकतात. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील. मात्र तुमचे पारडे जड राहील. मुलांची प्रगती होईल. मात्र त्यांचा वेळ कुठे जात आहे याकडे लक्ष द्या.तूळ – आरोग्याची काळजी घ्या. बेपरवाई करू नका. जास्त दगदग धावपळ होईल असे काम करणे टाळा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. मुलांशी वाद न घालता संवाद साधा. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.

वृश्चिक – अनुकूल घटना घडतील. महत्त्वाच्या वार्ता कानांवर पडतील. मुलांना अनपेक्षित संधी मिळतील. भाग्याची साथ राहील. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मात्र हितशत्रूंपासून सावध राहा. महत्त्वाचे काम मार्गी लागेल.

धनू – घरी पाहुणे येतील. महत्त्वाचे व्यवहार पार पडतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरीत अनुकूल बदल होतील. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.

मकर – जवळच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायात भरभराट होईल. मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. जीवनसाथी चांगली साथ देईल. मनात आनंदी विचार राहतील. मौजमजा करण्याकडे कल राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

कुंभ – आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल. योग्य लोकांच्या संगतीत राहा.

मीन – मन प्रसन्न राहील. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात जोडीदाराचा सल्ला घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. मालमत्तेच्या कामात फायदे होतील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष