शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

आजचे राशीभविष्य - २३ सप्टेंबर २०२१: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींची येणी वसूल होतील; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 07:24 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - मनाची एकाग्रता कमी राहील्याने मन दुखी राहील असे गणेशजी सांगतात. शारीरिक ताण जाणवेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक आणि जपून करा. या गुंतवणुकीपासून फारसा लाभ होणार नाही असे गणेशजी सांगतात. महत्वाच्या कागदपत्रांकडे अधिक लक्ष द्या. कौटुंबिक वातावरणात सुधारणा होईल. धार्मिक कार्ये घडतील. अधिक वाचा

वृषभ - व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याचा दृष्टिने शुभ दिवस आहे असे गणेशजी सांगतात. मित्र आणि वडीलधार्‍यांच्या भेटी घ्याव्या लागतील. नवे मित्र मिळतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. प्रवास व सहलीचा योग आहे. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आप्तांवर खर्च होईल. त्यांच्याशी मतभेदही होतील. धार्मिक कार्यांवर खर्च होईल. अधिक वाचा

मिथुन - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस शुभ आहे असे गणेशजी सांगतात. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. वरिष्ठांची शुभदृष्टी कार्यात यश देईल आणि लाभ प्राप्त करून देईल. मित्रांकडून लाभ होतील. अधिक वाचा

कर्क - मानसिक तणाव आणि बेचैनीने दिवसाचा प्रारंभ होईल. शारीरिक दृष्टया आळस आणि मरगळ राहील. पोटाचा त्रास जाणवेल. कोणत्याही कार्यात दैवाची साथ मिळणार नाही. संततीविषयक चिंता वाढेल. दुपारनंतर मात्र मन प्रसन्न राहील आणि शारीरिक उत्साह वाढेल. व्यापारी वर्गांला येणी वसूल होतील. अधिक वाचा

सिंह - श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस मध्यमफलदायी जाईल. आचार विचारांवर संयम आणि अनैतिक गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेशजी देतात. मानसिक आणि शारीरिक कष्ट वाढतील. त्यामुळे स्वास्थ्य बिघडेल. अचानक धनलाभ होईल. संतती विषयक चिंता वाढल्याने निरर्थक खर्च करावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद शक्यतो टाळा. अधिक वाचा

कन्या - कलेचे प्रदर्शन आणि सामाजिक दृष्टिने आपणांस यश, कीर्ती मान-सम्मान मिळतील असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायक्षेत्रात भागीदारांना अनुकूल काळ करमणुकीमुळे दिवस आनंदात जाईल. व्यापारी वर्गाची येणी वसूल होतील. दुपारनंतर तब्बेत यथा- तथाच राहील. अचानक लाभाची शक्यता. ईश्वरभक्ती आणि आध्यात्मिक चिंतन मनाला- शांती देईल. अधिक वाचा तूळ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणांसाठी शुभ फलदायी असेल. कोणतेही कार्य खंबीर मनाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी आणि शांत राहील. वाणीवर संयम ठेवा. कलावंतांना आजचा दिवस शुभ आहे. कार्यनैपुण्य आणि कलेची जाण प्रदर्शीत करण्याची संधी मिळेल. मनोरंजक वातावरणात आपण आनंदात असाल व आप्तेष्टांना त्यात सहभागी करून घ्याल. अधिक वाचा

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आज आपणाला साहित्यात रुची वाटेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. खंबीर मन आणि आत्मविश्वास वाढेल. तब्बेतही चांगली राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. तरीही प्रत्येक कार्य शांतपणे करा. अधिक वाचा

धनु - आज सावधपणे वागा असे श्रीगणेशाय सांगतात. आईच्या तब्बेतीत बिघाड आणि घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या. त्यामुळे आपले स्वास्थ्य बिघडू शकते. आर्थीक नुकसान आणि बदनामी होईल. दुपारनंतर मात्र मन सृजन कार्याकडे ओढ घेईल आणि प्रसन्नता राहील. विद्यार्थ्यांना आजचा दिवस शुभ आहे. अधिक वाचा

मकर - वैवाहिक जीवन साथीदारांशी मधूर संबंध राहतील. मित्रांसमवेत सहलीचे नियोजन कराल. भावंडे आणि नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. दुपारनंतर एखाद्या दुर्घटनेमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. व्यावसायिकांना व्यावसायिक चिंता भेडसावतील. अधिक वाचा

कुंभ - खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर आणि जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. दुपारनंतर विचारात स्थैर्य येईल. सृजनशील व कलात्मक गोष्टींकडे आपला कल राहील. घरातील वातावरण सुख- समाधानाचे राहील. कार्यात यश मिळेल असे श्रीगणेश सांगतात. अधिक वाचा

मीन - आज आपल्या घरी धार्मिक कार्य होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कार्ये तडीस जातील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. नवीन कामे हाती घेण्यास दिवस शुभ आहे. दुपारनंतर संतापी वृत्ती वाढीस लागेल. त्यामुळे उक्ती आणि कृतीवर संयम ठेवा. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद न होण्याचे प्रयत्न करा असे श्रीगणेश सांगतात. अधिक वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य