शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - १९ सप्टेंबर २०२१: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना उत्तम आनंदी दिवस; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 07:18 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - श्रीगणेश सांगतात की आज मित्रांच्या संगतीमध्ये आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन मित्रांमुळे भविष्यात लाभ होतील. संततीकडूनही फायदा होईल. नैसर्गिक ठिकाणी जाण्याचे बेत आखाल. सरकारी कामात यश मिळेल. अधिक वाचा

वृषभ - नोकरदारांसाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. नवकार्यारंभ यशस्वीरीत्या कराल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पदोन्नती पण मिळू शकेल. गृहस्थीजीवनात माधुर्य वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील. अधिक वाचा

मिथुन - कोणतेही नवे काम सुरू करायला दिवस अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात. शरीरात थकवा आणि आळस असल्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटाच्या व्याधी त्रस्त करतील. वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल. महत्त्वपूर्ण कामातील कोणताही निर्णय आज घेऊ नका. अधिक वाचा

कर्क - प्रत्येक गोष्टीत आज जपून व्यवहार करा असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद करू नका. वाणी आणि संतापावर संयम राखा. त्यामुळे संकटे टळतील. खर्च वाढण्याची शक्यता. निषेधार्ह आणि अनैतिक कामांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणश देतात. अधिक वाचा

सिंह - वैवाहिक जीवनात आपापसांतील कुरबुरीमुळे पत्नी व पती यांच्यात तणाव वाढेल. साथीदाराची तब्बेत बिघडेल. भागीदार आणि व्यापारी यांच्याशी शांतपणे व्यवहार करा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद यात पडू नका. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. अधिक वाचा

कन्या - आज उत्साह आणि स्वास्थ्य अनुभवाल. घरात व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. रुग्णांची तब्बेत सुधारेल. माहेरहून आनंदी वार्ता येतील. कार्यसंपन्नतेमुळे यश मिळेल. अधिक वाचा

तूळ - आजचा दिवस मध्यम फलदायी जाईल. संततीची काळजी सतावेल. विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद-विवाद, बौद्धिक चर्चा यापासून दूर राहा. आज सुरू केलेले काम पूर्ण होणार नाही. प्रियव्यक्तीची भेट होईल. अधिक वाचा

वृश्चिक - आज शांतचित्ताने दिवस घालवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. चिंताग्रस्त मन आणि अस्वस्थ शरीर आपणाला ग्रासून टाकेल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानी... अधिक वाचा

धनु - नवकार्यारंभास शुभ दिवस. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसमवेत प्रवासाचे बेत ठरवाल. तब्बेत चांगली राहील. भाग्योदय होईल. रहस्य आणि आध्यात्मिकते मध्ये गोडी वाटेल. आज कार्यसिद्धीचा दिवस आहे. अधिक वाचा

मकर - आज घरातील व्यक्तींशी वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याकडे लक्ष द्या. बोलण्यातील संयमच आपणाला संकटातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. तब्बेत साधारणच असेल. डोळ्यांचा त्रास संभवतो. अधिक वाचा

कुंभ - श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आनंदी राहाल. भौतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसमवेत प्रवास आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेच्या भेट वस्तूंमुळे आनंदी राहाल. अधिक वाचा

मीन - अतिलोभ आणि हव्यास यात फसू नका असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आर्थिक विषयात खूप सावध राहा. आर्थिक गुंतवणूक शिक्का, सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. तब्बेत बिघडू शकते. मनाची एकाग्रता राहणार नाही. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होतील. अधिक वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य