शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आजचे राशीभविष्य - १० ऑक्टोबर २०२१: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचा, आनंदी दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 07:18 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आज सांसारिक बाबींपासून दूर राहून आध्यात्मिक विषयात मग्न राहाल. त्यामध्ये गहन चिंतनशक्ती आपणाला मदत करेल. गूढ आणि रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याचे योग आहेत. तरीही बोलण्यावर संयम ठेवा. त्यामुळेच अनर्थकारी संकटांपासून दूर राहाल. हितशत्रूंपासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. अचानक धनलाभ होईल. अधिक वाचा

वृषभ - कुटुंबीयांसमवेत सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्‍यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात यश आणि कीर्ती प्राप्त होईल. अचानक धनलाभाची पण आज शक्यता आहे. अधिक वाचा

मिथुन - कार्यपूर्ती आणि यश-कीर्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसमवेत आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची पण आज शक्यता आहे. महत्त्वाच्या विषयांवर खर्च होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. तरीही आपण वाणी आणि क्रोध यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी सहकार्य करतील. अधिक वाचा

कर्क - शारीरिक दृष्टया ढिलेपणा आणि मानसिक व्यापयात आजचा दिवस संपे असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय टाळा. शक्य असेल तर प्रवासही करू नका. अपचन, अजीर्ण असे विकार त्रास देतील. अधिक वाचा

सिंह - आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. उक्ती आणि कृती यावर संयम ठेवून वादविवादापासून बचाव करावा. आईशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मनावर वैचारिक दृष्टीने नकारात्मकतेचा पगडा राहील. स्थायी संपत्तीच्या कागदपत्रावर सही करताना दक्षता बाळगा. अधिक वाचा 

कन्या - शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळे आज मनाला शांततेचा लाभ मिळेल. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याशी असणारे संबंधात माधुर्य वाढेल. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल. गूढ आणि आध्यात्मिक विषयात सिद्धी प्राप्त होईल. अधिक वाचा

तूळ - द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे जमणार नाही. महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस चांगला नाही. कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे. व्यवहारात हटवादीपणा सोडल्यामुळे परिणाम सकारात्मक मिळतील. आर्थिक लाभ होतील. अधिक वाचा

वृश्चिक - आज शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील. मित्र आणि स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

धनु - उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवला नाही तर आपत्ती येण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिकदृष्ट्या चिंतेत राहाल. अपघातापासून जपा. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. अधिक वाचा

मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. सगेसोयरे आणि मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहोत्सुकांना इच्छित साथीदार लाभल्याने आनंद वाटेल. व्यापारातही दिवस लाभदायी ठरेल. सहली- प्रवास होतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. अधिक वाचा

कुंभ - आज शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. समाजात मान- सन्मान प्राप्त होतील. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत आनंददायी प्रवास कराल. आज दिवसभर कामे सहजपणे यशस्वी होत असल्याचा अनुभव येईल. अधिक वाचा

मीन - वरिष्ठ अधिकार्‍यांशी असलेले संबंध दुरावणार नाहीत याकडे लक्ष देण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. शारीरिक कंटाळा आणि मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका आणि मानसिकदृष्ट्या स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. हा प्रवास यशस्वी होईल. अधिक वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य