शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १० मार्च २०२२: पैशांचा ओघ सुरु राहील; विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 07:38 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष: तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. पचेल तेच खा. अन्यथा पोट खराब होऊ शकते. पैशांचा ओघ सुरू राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. नोकरीत आगेकूच सुरू राहील. शेती, घराचे व्यवहार करताना नीट माहिती घ्या.

वृषभ: नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. मान मिळेल. जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील. मनाला आनंद मिळेल अशा घटना घडतील. कामे मार्गी लागतील. त्यासाठी लोकांचे सहकार्य मिळेल. 

मिथुन: नोकरीत फारसे बदल होणार नाहीत. नेहमीच्या कामात उत्साह राहील. पूजापाठ करण्यासाठी वेळ द्याल. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. खर्चाला आवर घातला पाहिजे. प्रवास शक्यतो टाळलेला बरे राहतील. 

कर्क: लोकांच्या भेटीगाठी होतील. मात्र कुणाला स्वतःहून सल्ला देऊ नका. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. प्रवास करावा लागेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. विविध प्रकारच्या सोयी-सुविधा मिळतील. 

सिंह: अनेक कामे हातावेगळी कराल. तरीही कामाचा डोंगर वाढतच जाईल. त्यामुळे कामाचा ताण न घेता प्राधान्यक्रम ठरवून कामे करा. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि यशस्वी व्हाल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. 

कन्या: मनावर दडपण कमी होईल. ग्रहमान अनुकूल राहील. मुत्सद्दीपणाने वागून आपण सफलता मिळवाल. प्रवास घडून येतील. लोकांच्या मनात काय आहे, हे लक्षात घेऊन सावधपणे वागणे आवश्यक आहे. बोलण्यावर संयम ठेवा. मुलांचे कौतुक होईल. 

तूळ: घरात सदस्यांशी समन्वय राहील. व्यवहार सांभाळून करा. प्रवास शक्यतो टाळा. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. आपले घोडे पुढे दामटता कधी कधी माघार घेण्यातही कमीपणा नसतो, तर मुत्सद्दीपणा असतो हे लक्षात घ्या.

वृश्चिक: नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. कामे मार्गी लागतील. तुमचे महत्त्व वाढेल. जीवनसाथीशी वैचारिक मतभेद होतील. मात्र, आपण बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. व्यवसायात भरभराट होईल. सतत कार्यमग्न राहाल.

धनु: आर्थिक आवक उत्तम राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. गप्पाटप्पांचा फड रंगेल. काही लोकांशी असलेले जुने वाद संपुष्टात येतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका.

मकर: अनुकूल परिस्थिती राहील. मनाला आनंद मिळेल अशा घटना घडतील. जोडीदार आपल्याला चांगली साथ देईल. प्रवासाचे योग येतील. प्रवासात सामान व कागदपत्रे यांची काळजी घ्या. प्रवासाचे नीट नियोजन करा. एकंदरीत चांगला दिवस आहे.

कुंभ: नोकरीत कामाचा व्याप वाढेल. काही कामे करताना वैताग होईल. मात्र, इतरांचे सहकार्य मिळेल. थोडे गोडीगुलाबीने बोलून वेळ मारून न्या. महत्त्वाच्या प्रकल्पाला वेळ द्याला लागेल. प्रेम प्रकरणात मनस्ताप सोसावा लागेल. 

मीन: व्यवसायात गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. मालमत्तेच्या कामात यश लागेल. पैशाचा ओघ चांगला राहील. व्यवसायात भरभराट होईल. कितीही झटलात तरी जवळचे नातेवाईक नाराज राहतील. 

- विजय देशपांडे 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य