शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०७ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आवक चांगली; यशकारक दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 07:33 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष: आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाच्या बातम्या कानावर पडतील. जवळच्या लोकांच्या सहवासात याल. हास्यविनोदात मन रमेल. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घ्या. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळेल.

वृषभ: आर्थिक उलाढाली जपून करा. व्यवहारात स्पष्टता ठेवायला हवी. अन्यथा गैरसमज होतील. नोकरीत लक्ष देऊन काम करा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. आर्थिक आवक सामान्य राहील. कामाच्या धबडग्यात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन: आपल्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक आवक सामान्य राहील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. लोकांना त्यांच्या चुका दाखवून द्याल; पण, त्यामुळे लोकं नाराज होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. 

कर्क: नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल सुरू राहील. महत्त्वाच्या निर्णयात तुमचा अभिप्राय जाणून घेतला जाईल. कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. नातेवाइकांच्या भेटी होतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल. मनात आनंदी विचार राहतील. 

सिंह: नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल. व्यवसायात विक्री चांगली होईल. सतत कार्यरत राहाल. कायद्याची बंधने पाळा.

कन्या: घरात किरकोळ कारणावरून कुरबूर होईल. पैसे खर्च होतील. काही कारणाने अडचणी येतील; पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग निघेल. जवळचे लोक सहकार्य करतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. कामात उत्साह राहणार नाही. विश्रांती घेतली पाहिजे.

तूळ: आपल्या मनात जे आहे ते जवळच्या लोकांशी बोलले पाहिजे. म्हणजे योग्य सल्ला मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. कुणाला उसने पैसे देताना विचा करून द्याल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. महत्त्वाचे निरोप येतील. आर्थिक उलाढाली जपून करा.

वृश्चिक: ऐकावे जनाचे, करावे मनाचे असे धोरण ठेवा. तसेच इतरांना मदत करताना स्वतः व स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. महत्त्वाच्या बातम्या कानावर पडतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. मोठ्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मिळेल. अचानक धनलाभ होईल.

धनु: मान, सन्मानात वाढ होईल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आर्थिक आवक चांगली राहील. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळले पाहिजे. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल.

मकर: जवळपासचे प्रवास घडतील. थोडा क्रोधाला आवर घातला पाहिजे. शेजारी, सहकारी, घरातील सदस्यांची बोलताना काळजी घ्या. कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. जेवढे शक्य होईल तेवढा बोलण्यात गोडवा असू द्या त्यासाठी संयम सोडू नका. 

कुंभ: धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आज मनात आनंदी विचार राहतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. 

मीन: धावपळीचा दिवस आहे. कामाचा ताण राहील. सतत कार्यरत राहाल. आर्थिक आवक चांगली राहील. मनात सकारात्मक राहतील. एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो. मनातील शंका लोकांशी बोलून दाखवा.

- विजय देशपांडे

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य