शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - ३० डिसेंबर २०२१: ‘या’ राशीच्या व्यक्तींना व्यवहारातून फायदा; धनलक्ष्मीची कृपा, यशकारक दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 07:20 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष: महत्त्वाची कामे सायंकाळच्या आत पूर्ण करून घ्या. जोडीदाराची चांगली साथ राहील. नोकरीत अनुकूल घटना घडतील. सहकारी मदत करतील. व्यवसाय विक्री चांगली होईल. जवळच्या लोकांशी संवाद राहील. नावलौकिकात भर पडेल. 

वृषभ: महत्त्वाचे काम थोडे पुढे ढकलणे ठीक राहील. किचकट कामे करताना कुणाला दुखावू नका. तब्येतीची काळजी घ्या. जोडीदाराशी मधूर शब्दांत संभाषण करा. नोकरीत थोडे सतर्क राहावे. प्रवासाचे नियोजन नीट केले पाहिजे. नाही तर ऐनवेळी धावपळ करावी लागेल. 

मिथुन: महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत उरका. अन्यथा दगदग होईल. प्रवासाचे योग येतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जीवनसाथी चांगली साथ देईल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोकांशी संपर्क राहील. 

कर्क: नोकरीत थोडी अस्थिरता जाणवेल. मात्र, खूप काळजी करण्याचे कारण नाही. हळूहळू अडचणी दूर होतील. नातेवाइकांच्या भेटी होतील. त्यांच्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जीवनसाथी चांगली मदत करेल. 

सिंह: नोकरीत चांगली परिस्थिती राहील. मात्र, एखाद्या कारणावरून गैरसमज होतील. काहींना प्रवास करावा लागेल. नातेवाइकांच्या भेटी होतील. घरात किरकोळ कारणावरून कुरबूर होईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. 

कन्या: धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वसुलीसाठी दुपारच्या आत प्रयत्न करा. मालमत्तेच्या व्यवहारात अनुकूलता राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अचानक चांगली संधी मिळेल. नोकरीत पगारवाढीची शक्यता आहे. घरी पाहुणे येतील. 

तूळ: आर्थिक आवक चांगली राहील. अचानक एखादा व्यवहार फायदा देऊन जाईल. मनात आनंदी विचार राहतील. ग्रहमानाची अनुकूलता राहील. दूरच्या प्रवासाचे योग. भावंडांच्या भेटीगाठी होतील. खाण्यापिण्याची लयलूट राहील. व्यवसायात भरभराट होईल. 

वृश्चिक: महत्त्वाचे काम पुढे ढकला. अन्यथा वेळ आणि पैसा खर्च होईल. काहींना प्रवास करावा लागेल. हातून दानधर्म घडेल. तुम्हाला यश मिळणारच आहे. मात्र, रागाच्या भरात कुणाचा अपमान करू नका. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. खाण्यापिण्याची चंगळ.

धनु: महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या आत पूर्ण करून घ्या. भेटीगाठी होतील. प्रवास होतील. देवदर्शन होईल. ग्रहमानाची अनुकूलता राहील. महत्त्वाचे लोक भेटतील. वाहन जपून चालवा. अचानक एखादा खर्च करावा लागेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. 

मकर: धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. मात्र, त्यासाठी थोडी दगदग होऊ शकते. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. ग्रहमानाची साथ राहील. घरी अचानक पाहुणे येण्याची शक्यता. नोकरीत बदली होऊ शकते. मुलाखतीत यश मिळेल. 

कुंभ: आर्थिक बाजू बळकट राहील. मनासारखी धनप्राप्ती होईल. दूरचे प्रवास करावे लागतील. नोकरीत अचानक चांगली संधी मिळेल. वादाचे प्रसंग खुबीने टाळा. वरिष्ठांकडून कौतुक होईल. उपयुक्त असे मार्गदर्शन मिळेल. 

मीन: महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र, थोडा संयम ठेवा. सायंकाळच्या नंतर कामात अपेक्षित यश मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रवासात काळजी घ्या. मुलांना घवघवीत यश मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य