शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - २८ डिसेंबर २०२१: ‘या’ राशीच्या व्यक्तींना प्रवासाचे योग, नवीन नोकरीच्या उत्तम संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 07:31 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष: महत्त्वाची कामे दुपारनंतर हाती घ्या. त्यात यश मिळेल. आज थोडी दगदग, धावपळ होईल. मात्र, सायंकाळनंतर कामे मार्गी लागल्याने कामाचा शीण निघून जाईल. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. 

वृषभ: महत्त्वाची कामे सायंकाळच्या आत पूर्ण करून घ्या. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात सावधानता बाळगा. मुलांच्या यशामुळे उत्साहात असाल. नावलौकिकात भर पडेल. काही अनुकूल तर काही प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जावे लागेल.

मिथुन: नोकरीत चांगले वातावरण राहील. तुमच्या सकारात्मक बोलण्याचा अनुकूल परिणाम दिसून येईल. मुले अभ्यासात प्रगती करतील. काहींना जवळचे प्रवास करावे लागतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. तुमचा नावलौकिक वाढेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. 

कर्क: नोकरीत बदल होतील. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. घरी नातेवाईक, मित्रमंडळी येतील. भावंडांशी गप्पाटप्पा होतील. जवळचे प्रवास करावे लागतील. व्यवसायात भरभराट होईल. जोडीदाराची तुमच्या कामात आश्वासक मदत मिळेल. 

सिंह: धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. घराशी संबंधित कामे कराल. भावंडांच्या सुख-दुःखात सहभागी व्हाल. प्रवासाचे योग येतील. नोकरीत वाद होतील. मात्र, तुमचे पारडे जड राहील. मुलांना अपेक्षित यश मिळेल.

कन्या: धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मनासारखी अर्थप्राप्ती होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. भावंडांशी गैरसमज होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. यश मिळेल. बढतीसाठी विचार होईल. 

तूळ: दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवासात काळजी घ्या. महत्त्वाचे काम सूर्यास्तानंतर करा. तोपर्यंत कामाचे नियोजन करा. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. काही कारणाने रुसवाफुगवा राहील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. जवळचे लोक भेटतील. 

वृश्चिक: आर्थिक आवक उत्तम राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. भेटवस्तू मिळतील. व्यवसायात भरभराट होईल. नफ्याचे प्रमाण वाढेल. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या आत पूर्ण करा. काहींना प्रवास करावे लागतील. 

धनु: नोकरीत बदलीची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. घरी पाहुणे येतील. आर्थिक आवक चांगली राहील. मनासारखी खरेदी करता येईल एवढा पैसा मिळेल. मालमत्तेची कामे होतील. काहींना भेटवस्तू मिळतील. 

मकर: भाग्याची साथ मिळेल. अडचणी दूर होतील. तीर्थयात्रा, पर्यटन, धार्मिक कार्य या निमित्ताने प्रवास होतील. नावलौकिक वाढेल. नोकरीत बदल होईल. कामाचे स्वरुप बदलेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. 

कुंभ: महत्त्वाच्या कामात सुरुवातीला अडथळे येतील. मात्र, थोडा संयम ठेवा. सूर्यास्तानंतर कामे मार्गी लागतील. नशिबाची साथ मिळेल. प्रवास करताना खबरदारी घ्या. नोकरीत वादापासून स्वतःला थोडे अलिप्त ठेवा. अधिकार मिळतील. 

मीन: जोडीदाराचे सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या आत पूर्ण करा. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. काहींना अचानक धनलाभ होईल.

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य