शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 22 मार्च, 2022; महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 07:42 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष - नोकरीत काही लाभ होईल. लोकांची मदत मिळेल. मात्र कामाचा ताण वाढेल. दगदगीची कामे टाळणे शक्य झाले तर बरे. प्रवासात त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रवासाचे नियोजन नीट करा अथवा प्रवास होता होईल तो टाळा. वाहन जपून चालवा.

वृषभ - अडचणी दूर होतील. महत्त्वाचे काम दुपारनंतर हाती घ्या. तोपर्यंत कामाचे नियोजन करून ठेवा. म्हणजे वेळ वाया जाणार नाही. जीवन साथी चांगली साथ देईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील.

मिथुन - आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दगदग होईल. मनस्ताप सहन करावा लागेल. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. काहींना अचानक धनलाभ होईल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.

कर्क - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीतील अडचणी दूर होतील. घरातील वाद कमी होतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. प्रवास कार्य साधक ठरतील. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. तुमचे महत्त्व वाढेल.

सिंह - व्यवसायात फेरबदल होतील. काही नवीन विचार मनात येतील. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. काहीना बदलीला सामोरे जावे लागेल. तब्येतीची काळजी घ्या. घरी पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील.

कन्या - महत्त्वाचे व्यवहार दुपारनंतर करा. त्यात यश मिळेल. गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. हिमतीने कामे करा. प्रवासाचा योग येईल. मुले प्रगती करतील. मात्र मुलांच्या मनात काय सुरु आहे हे लक्षात घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. जोडीदार साथ देईल.

तूळ - आर्थिक आवक चांगली राहील. मनावरील ताण निघून जाईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. दुपारनंतर महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

वृश्चिक - मनात आनंदी विचार राहतील. जीवन साथी चांगली साथ देईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. दुपारनंतर महत्त्वाच्या कामासाठी प्रयत्न करा. फार दगदग न होता कामे होतील. खर्चाचे नियोजन नीट करा. मुलांना यश मिळेल. भावंडांच्या भेटी होतील.

धनू - काही फायदे होतील. महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. अन्यथा म्हणावे तसे यश मिळणार नाही. काहींना प्रवास करावा लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. आर्थिक बाजू चांगली राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

मकर - लाभदायक परिस्थिती राहील. कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे काम दुपारनंतर करा. विनासायास यश मिळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. मित्र, जवळचे लोक भेटतील. प्रवासाचा योग येईल. जीवन साथीशी मधुर संबंध राहतील. भावंडांच्या भेटी होतील.

कुंभ - नोकरीत अनुकूल घटना घडतील, योग्य ठिकाणी बदली होऊ शकते. घरी नातेवाईकांचे आगमन होईल. त्यांच्या सरबराईत वेळ व पैसा खर्च होईल. मालमत्तेची कामे होतील. त्यात आपल्याला फायदा होईल.

मीन - भाग्याची चांगली साथ राहील. महत्त्वाचे काम दुपारनंतर हाती घ्या. काहींना पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. आर्थिक आवक चांगली राहील. भेटवस्तू तसेच विविध प्रकारचा लाभ होईल. मित्र मैत्रिणींची चांगली साथ राहील.- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद) 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष