शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 19 मार्च, 2022; अलभ्य लाभ होतील; महत्वाची कामे टाळा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 07:33 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...     

मेष- लोकांना तुमचे म्हणणे पटवून देण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात दगदग होईल, आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृषभ- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होईल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. एकंदरीत चांगला दिवस आहे.

मिथुन- घरी पाव्हण्या-रावळ्यांचा आदळ राहील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. नोकरीत अनुकूल घटना घडतील. काही बदल होतील. नवीन नोकरीचे प्रयत्न फलद्रूप होतील.

कर्क- नातेवाईक, स्नेहीजन यांच्या सहवासात याल. घरात आनंदी वातावरण राहील. नवीन वस्तू खरेदी कराल. देवदर्शन करण्याच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. प्रेमात असाल तर घरी सांगण्यास हरकत नाही. जीवनसाधीशी मधुर संबंध राहतील.

सिंह- संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक आवक चांगली राहील. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आवश्यक तो वेळ द्यावा लागेल. खाण्याचे तंत्र सांभाळा. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. व्यवस्थित नियोजन करून प्राधान्यक्रम ठरवून कामे करा.

कन्या- ग्रहमान अनुकूल राहील. यश तुमचेच राहील. महत्त्वाचे निरोप येतील. अपेक्षित संधी मिळतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात भरभराट होईल. कामाच्या घबडग्यात स्वतःसाठीपण थोडा वेळ काढा. प्रगतीच्या वाटेवरील अडचणी कमी होतील.

तूळ- महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. अन्यथा पैसा खर्च होईल. मनस्ताप सहन करावा लागेल. त्यापेक्षा संयम ठेवलेला बरा. नोकरीत जास्त कष्ट करावे लागतील. काहींना प्रवास करावा लागेल. घरातील सदस्यांशी समन्वय ठेवा. त्यांना काय हवे नको ते पाहा.

वृश्चिक- मनातील काळजी निघून जाईल. आश्वासक लोकांच्या संपर्कात राहा. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अनेक मार्गानी धनप्राप्ती होईल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. स्नेहीजनांचे सहकार्य मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

धनू- नोकरीत आघाडीवर राहाल. महत्त्वाच्या प्रकल्पात तुमच्यासाठी चांगली संधी चालून येईल. तुमचा अभिप्राय महत्त्वाचा ठरेल. घर, जमीन खरेदीचे मनसुबे यशस्वी होताना दिसतील. कामाचा व्याप वाढेल. एखाद्या मेजवानीच्या कार्यक्रमाला जाल.

मकर- नशिबाची साथ राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांची मदत होईल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. महत्त्वाची कामे पुढे ढकला. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. 

कुंभ- संमिश्र ग्रहमान राहील. काही कारणाने थोडे गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. पैशाची गरज नसताना उधळपट्टी करू नका. बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा. सगळे तुमचे ऐकतीलच असा अट्टहास करू नका.

मीन- चांगल्या बातम्या कानावर पडतील. महत्त्वाचे निरोप येतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. काही अलभ्य लाभ होतील. महत्त्वाचे काम होईल. अनेकांचे सहकार्य मिळेल.

-विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष