शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 18 जानेवारी, 2022; मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 07:40 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. घरी पाव्हण्या रावळ्यांचा राबता राहील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. कामात बदल होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. आर्थिक व्यवहार सांभाळून करा.

वृषभ- व्यवसायात विक्री चांगली राहील. जीवनसाथीची काळजी घ्या. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र, तुमच्या जवळीकीचा कुणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या. भावंडांशी वाद होऊ शकतात. किरकोळ कारणावरून गैरसमज होतील.

मिथुन - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. संपत्तीची कामे होतील. त्यात आपल्याला फायदा होईल. कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका. भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा. मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील.

कर्क- मनात आनंदी विचार राहील. तणाव दूर होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथी चांगली साथ टेईल. तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक आवक ठिकठाक राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. भविष्याची चिंता करू नका.

सिंह- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. मुलांना यश मिळेल. मुलांची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. मनावर थोडा ताण राहील. आर्थिक स्थिती सामान्य राहील. भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा.

कन्या- धनलक्ष्मीची कृपा राहील. सहजासहजी आर्थिक लाभ होईल. भेटवस्तू मिळेल. घरात वादविवाद टाळणे चांगले. नोकरीत मतभेद होतील. जीवनसाथीशी वाद होतील. व्यवसायात चांगली स्थिती राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल.

तूळ- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू कराल. यश मिळेल. बदलीची शक्यता आहे. घरी आल्यागेल्याची वर्दळ राहील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक- भाग्याची उत्तम साथ मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे सौंदे ठरतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. प्रवासाचा योग येईल. मुलांशी वाद टाळा. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे म्हणणे समजून घ्या. नातेवाईकांची भेट होईल.

धनू - जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. आर्थिक आवक चांगली राहील. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. गेस्समज होऊ शकतात. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास टाळा. नोकरीत चांगली स्थिती राहील.

मकर- खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च होतील. मित्रांच्या संगतीत वाहवत जाणे अडचणीचे ठरू शकते. बेफिकिरीने वाग नका. जीवनसाथी चांगली साथ देईल. व्यवसायात यश मिळेल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

कुंभ- आर्थिक आवक चांगली राहील. विविध मार्गांनी पैसे मिळतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. नोकरीत एक पाऊल पुढे पडेल.

मीन- नोकरीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. मात्र काही बाबतीत मतभेद होतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. सरकारी कामे मार्गी लागतील. प्रसिद्धी मिळेल. नावलौकिक वाढेल.

-विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष