शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 15 जानेवारी, 2022; प्रेम-प्रकरणात यश, अचानक धनलाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 07:49 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष- जवळचा प्रवास करावा लागेल. अडचणी दूर होतील. भावंडांच्या भेटी होतील. व्यवसायात भरभराट होईल. मोठे निर्णय घेताना चलबिचल होईल. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल.

वृषभ- आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मात्र कागदपत्रे वाचून घ्या. खाण्या-पिण्याची मौज राहील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. भाग्याची साथ राहील. जोडीदाराची मर्जी सांभाळा. कामाच्या ठिकाणी वाद टाळणे योग्य ठरेल.

मिथुन - मन प्रसन्न राहील. अडचणी दूर होतील. आनंददायक घटना घडेल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. मधुर संबंध राहतील. काहींना मित्र-मैत्रिणी यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. मुलांना घवघवीत यश मिळेल. त्यांचे कौतुक होईल. योग्य मार्गदर्शन करा.

कर्क - दूरचा प्रवास करावा लागेल. धार्मिक कार्यात मन रमेल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. मन अस्वस्थ राहील. जोडीदार तुम्हाला समजून घेईल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडा संयम ठेवा, काम शक्य असेल तर पुढे ढकलणे ठीक राहील.

सिंह- आर्थिक आवक समाधानकारक राहील. भेटवस्तू मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. जीवन सुखकर होण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरीत कामाचा ताण राहील. दगदग होईल. मुलांना घवघवीत यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या- नोकरीत मनासारखी स्थिती राहील. कामाचा ताण कमी होईल. मात्र नवीन जबाबदारी मिळेल. काहींची बदली होऊ शकते. नवीन काम तुमच्या मर्जीनुसार राहील. मुलांना अपेक्षित संधी मिळेल. त्यांचा उत्कर्ष होईल. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ- भाग्याची उत्तम साथ मिळेल. प्रवासकार्य साधक ठरतील. काहींना पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. समाजसेवा करण्यात आघाडीवर राहाल. व्यवसायात उत्कर्ष होईल. मालाची विक्री चांगली होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.

वृश्चिक- अचानक धनलाभ होऊ शकतो. आवक उत्तम राहील. एखाद्या व्यवहारात फायदा होईल. नातेवाईकांच्या भेटी होतील. त्यांच्याशी संवाद राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळा. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य राहील.

धनू- प्रेम-प्रकरणात यश मिळेल. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. विविध व्यवहारात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात गुंतवणूक जपून करा. महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. त्यामुळे हायसे वाटेल.

मकर - खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. मालमत्तेच्या व्यवहारात सावधानता बाळगा. महत्त्वाच्या कामात दिरंगाई होऊ शकते. मात्र, त्यामुळे खूप मनस्ताप करून घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीची काळजी घ्या.

कुंभ- विविध प्रकारचे लाभ होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. भेटवस्तू मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्च होईल. काहींना जवळपासच्या प्रवासाचा योग येईल. नोकरीत वादाचा प्रसंग येईल. मुलांना घवघवीत यश मिळेल.

मीन- नोकरीत मनासारख्या घटना घडतील. कामाचा ताण कमी होईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा उपलब्ध होतील. सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. घरी पाहुणे येतील. आर्थिक आवक चांगली राहील.-विजय देशपांडे (ज्योतिष विशारद) 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष