शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 14 जानेवारी, 2022; जीवनसाथीला नाराज करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 07:45 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष- विविध कामांमध्ये यश मिळेल. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. आर्थिक आवक ठिकठाक राहील. पैशाच्या व्यवहारात सावधानता बाळगणे आवश्यक आहे. भाऊबंदांशी वाद होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या. बेफिकीरपणे वागू नका.

वृषभ- विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. मात्र, थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. कामातून सवड काढून आवडत्या छंदासाठी वेळ द्या. कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात जीवनसाथीचा सल्ला मोलाचा ठरेल.

मिथुन - विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. प्रवास शक्यतो टाळा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन चांगल्या पद्धतीने करा. म्हणजे वेळ व पैशाची बचत होईल.

कर्क - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जोडीदाराचे महत्त्व लक्षात येईल. तब्येतीच्या बाबतीत बेपर्वाईने वागू नका. बाहेरचे तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळा. काहींना भेटवस्तू मिळतील. संयमाने वागणे आवश्यक आहे. महत्त्वाची कागदपत्रे शोधून व्यवस्थित ठेवा.

सिंह- मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. योग्यतेनुसार संधी मिळेल. त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. कामानिमित्त धावपळ होईल. जीवनसाथीला नाराज करु नका.

कन्या - ग्रहमानाची अनुकूलता राहील. कामे आटोक्यात येतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नशिबाची साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सरकारी कामे मार्गी लागतील. व्यवसायात अंदाज चुकू शकतात. थोडी खबरदारी घेतली पाहिजे.

तूळ - उद्योग धंद्यात बरकत राहील. विक्री चांगली होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र, धीर सोडू नका. वादविवाद टाळलेले बरे. प्रवासात दगदग होईल. नातेवाइकांच्या भेटी होतील. मालमतेचे व्यवहार, करार मदार करताना कागदपत्रे वाचून सही करा.

वृश्चिक - एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. कामे मार्गी लागतील. कुणाचे मन दुखवू नका. सामोपचाराने व्यवहार पूर्ण करा. जीवनसाथीची मर्जी सांभाळा.

धनू- नोकरीत मोठी जबाबदारी उचलावी लागेल. दगदग होईल. मात्र, कामाचा खूप ताण घेऊन कामे न करता थोडे खेळीमेळीच्या वातावरणात काम करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात मोठी उलाढाल होणार नाही. तब्येतीच्या बाबतीत चालढकल करू नका.

मकर- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. पैशाची बचत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांच्या प्रगतीचा तटस्थपणे आढावा घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. प्रवासाचे नियोजन नीट करा. अनोळखी लोकांशी सावधपणे व्यवहार करा.

कुंभ- नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. कामाचा ताण वाढेल. चिडचिड होऊ शकते. थोडे संयमाने वागलेले बरे. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वाहनाचा वेग कमी ठेवा. कोर्ट कचेरीच्या कामात सफलता मिळेल.

मीन- सार्वजनिक कार्यासाठी वेळ द्यावा लागेल. लोकांच्या भेटीगाठी होतील. लोकांचे सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायात अनुकूल घटना घडतील. वाहन सुख मिळेल. एखाद्या क्षेत्रातील जाणकाराशी बातचीत करण्याचा योग येईल.- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष