शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 12 जानेवारी, 2022; तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 07:46 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष- नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. मात्र आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून गैरसमज करून घेऊ नका. मुलांना यश मिळेल. अनेकांचे सहकार्य मिळेल.

वृषभ- नोकरीत गुप्त शत्रूपासून सावध राहा. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. प्रवासात दगदग होईल. मिळकतीच्या तुलनेत खर्च जास्त राहील. थोडा क्रोधाला आवर घातला पाहिजे. घरात जास्त वेळ देऊन घरातील सदस्यांशी संवाद साधला पाहिजे.

मिथुन- पैशाचा ओघ चांगला राहील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. जोडीदारावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. एखादी अनपेक्षित संधी किंवा प्रस्ताव समोर येईल. कामाचा व्याप वाढेल. काहींची तारांबळ उडू शकते.

कर्क - अनुकूल असे ग्रहमान आहे. तुमच्या कामगिरीवर सारे खुश राहतील. तुम्हाला मात्र कामासाठी दगदग होईल. पण दाद मिळाल्याने तुम्हाला श्रमाचे काही वाटणार नाही. नवीन कामाच्या 'ऑर्डर' मिळतील. एखादी सुखद वार्ता समजेल. घरी लोकांची ये-जा सुरू राहील.

सिंह - अचानक प्रवासा करावा लागेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलण्यामुळे मनाला शांती मिळेल. आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न कराल. घरातील तणाव त्यामुळे कमी होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील.

कन्या- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. मात्र जुगारसदृश व्यवहार टाळावेत. तब्येतीची काळजी घ्या. खाणे-पिणे नियंत्रणात ठेवा. नोकरीत प्रगती होईल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो.

तूळ - भागीदारी व्यवसायात यश मिळेल. मात्र करणार असाल तर कागदपत्रे वाचून मगच सही करा. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. घरात मंगलकार्य शक्यता आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.

वृश्चिक - मौजमजेसाठी वेळ देता येईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. नातेवाईकांच्या भेटी होतील. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. पण संयम सोडू नका. व्यवसायात बरकत राहील.

धनू- ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. प्रवासात फायदा होईल. तुमच्या कामाला जाणकारांची दाद मिळेल. मुलांना घवघवीत यश मिळेल. त्यांचे कौतुक होईल. प्रेमात यश मिळेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळतील. आवडते पदार्थ ताटात दिसतील.

मकर- नोकरीत बदल होऊ शकतात. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळेल. घरी पाहुणे येतील. त्यांची आवभगत करावी लागेल. घरातील उपकरणाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे लागेल. पैसा खर्च होईल.

कुंभ- धनलक्ष्मीची कृपा राहील. विविध मार्गांनी पैसे मिळतील, सरकारी कामे सहजासहजी पूर्ण होतील. उच्चपदस्थ लोकांची मदत मिळेल. नोकरीत वादापासून थोडे दूर राहा. व्यवसायात विक्री चांगली होईल.

मीन- विविध प्रकारचे लाभ होतील. कायदेशीर कामे. सरकारी कामे यात यश मिळेल. नोकरीत बढतीसाठी प्रयत्न करीत असाल तर यश मिळेल. सहकारी चांगली साथ देतील. जीवनसाथीची योग्य मदत मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष