शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 26 जानेवारी, 2022; प्रेमात असाल तर घरच्यांना सांगण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 08:05 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...  

मेष- प्रवासाचा योग येईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. नवीन ओळखी होतील. विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालवाली होतील. प्रेमात असाल तर घरच्या लोकांना सांगण्यास हरकत नाही. नोकरीत चांगली स्थिती राहील.

वृषभ- आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकलणे इष्ट ठरेल. भांडणतंटे टाळणे चांगले राहील. प्रवासात दगदग होईल. थोडी काळजी घ्या. नोकरीत दक्ष राहावे. इतरांच्या भानगडीत नाक खुपसू नका.

मिथुन- अनुकूल परिस्थिती राहील. ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कानावर पडतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नोकरीत संयमाने वागणे आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळू देऊ नका. कायद्याची बंधने पाळा.

कर्क- नोकरीत व्यस्त राहावे लागेल. कामाचा ताण राहील. एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हावे लागेल. नियोजनपूर्वक काम करा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. लोकांच्या भेटीगाठी होतील. नातेवाईकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे लागेल.

सिंह- व्यवसायात बरकत राहील. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. कामाचा ताण राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. फिरणे होईल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील.

कन्या- घरात आनंदी वातावरण राहील. घरातील सदस्यांशी समन्वय राहील. आवडीचे पदार्थ ताटात दिसतील. नोकरीत जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्ण करण्यात आपण यशस्वी व्हाल. काहींना अचानक धनलाभ होईल. कुणाला स्वतः हून सल्ला देऊ नका. 

तूळ - घरी पाहुणे  येतील. त्यामुळे एकच गडबड राहील. जोडीदार साथ देईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामे मार्गी लागतील. कामात उत्साह राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. भाग्याची उत्तम साथ मिळेल. व्यवसायात नाव होईल.

वृश्चिक - व्यवसायात विक्री चांगली होईल. मेहनत घ्यावी लागेल. मनासारखे भोजन मिळेल. घरात संयमाने बोलणे आवश्यक आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलली तर बरे राहील. पैसा मिळेल पण टिकणार नाही. गोळाबेरीज सारखीच राहील.

धनू- महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. यशदायक काळ आहे. आर्थिक आवक मनासारखी राहील. योग्य व्यक्तीच्या सल्ल्याचा फायदा होईल. हातून दानधर्म घडेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल.

मकर - संयमाने वागणे आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. नातेवाईकांची भेट होईल. त्यांच्यासाठी धावपळ करावी लागेल. मुलांशी संवाद साधा. वादविवाद टाळणे चांगले राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ- ग्रहमान अनुकूल राहील. आर्थिक आवक राहील. योग्य सल्ला मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनावरचा ताण कमी होईल. मनात उत्साह राहील. मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आनंद मिळेल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल.

मीन- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. पैशाचा ओघ चांगला राहील. नोकरीत चांगली स्थिती राहील. एक पाऊल पुढे पडेल. तुमचे महत्त्व वाटेल. कायदेशीर कामे पूर्ण होतील. महत्त्वाची कामे संयम ठेवून करा. प्रवासात कागदपत्रे सांभाळा.

-विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष